‘लष्कर-ए-तोयबा’च्या मदतीशिवाय हल्ला शक्यच नव्हता; पहलगाम हल्ल्याबाबत पाक कनेक्शन उघड, UNSC च्या अहवालात खुलासा

पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी स्वीकारणाऱ्या ‘द रेझिस्टन्स फोर्स’ (टीआरएफ) आणि पाकिस्तानमधील दहशतवादी संघटना ‘लष्कर-ए-तोयबा’ (एलईटी) यांच्यात जवळचे संबंध असल्याचे आणि या दोन्ही संघटना एकमेकांना पूरक असल्याचे निरीक्षण संयुक्त राष्टर सुरक्षा परिषदेच्या (यूएनएससी) निर्बंध देखरेख अहवालात प्रथमच नमूद करण्यात आले आहे.
 ‘लष्कर-ए-तोयबा’च्या मदतीशिवाय हल्ला शक्यच नव्हता; पहलगाम हल्ल्याबाबत पाक कनेक्शन उघड, UNSC च्या अहवालात खुलासा
संग्रहित छायाचित्र
Published on

नवी दिल्ली : पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी स्वीकारणाऱ्या ‘द रेझिस्टन्स फोर्स’ (टीआरएफ) आणि पाकिस्तानमधील दहशतवादी संघटना ‘लष्कर-ए-तोयबा’ (एलईटी) यांच्यात जवळचे संबंध असल्याचे आणि या दोन्ही संघटना एकमेकांना पूरक असल्याचे निरीक्षण संयुक्त राष्टर सुरक्षा परिषदेच्या (यूएनएससी) निर्बंध देखरेख अहवालात प्रथमच नमूद करण्यात आले आहे.

‘यूएनएससी’च्या अहवालात वरील बाब प्रथमच नमूद करण्यात आल्याने सीमेपलीकडून पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी कारवाया केल्या जात असल्याच्या भारताच्या आरोपाला पुष्टी मिळत असल्याचे मानले जात आहे.

लष्कर-ए-तोयबाच्या मदतीविना पहलगाम येथील हल्ला शक्यच नव्हता, पहलगाम हल्ल्याचे पाकिस्तान कनेक्शन उघड झाले आहे. टीआरएफ आणि लष्कर-ए-तोयबा यांच्यात जवळचे संबंध असल्याचे आणि या दोन्ही संघटना एकमेकांना पूर असल्याचे अहवालामध्ये म्हटले आहे.

‘टीआरएफ’ने हात झटकले

या हल्ल्याची जबाबदारी सुरुवातीला टीआरएफ या दहशतवादी संघटनेने स्वीकारली होती. टीएरएफने हल्ल्यानंतर दोन वेळा जबाबदारी घेतली आणि घटनास्थळाचे फोटोदेखील प्रसिद्ध केले होते. मात्र, पाकिस्तानने हल्ल्याशी आपला संबंध नाकारल्यानंतर टीआरएफनेही आपले हात झटकले होते. यूएनएससी पथकाच्या वार्षिक अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे, की हा हल्ला लष्करच्या पाठिंब्याशिवाय होऊ शकत नव्हता.

या हल्ल्यानंतर भारताने प्रथम ऑपरेशन सिंदू आणि त्यानंतर ‘ऑपरेशन महादेव’ राबवून तीन दहशतवाद्यांना ठार केले. या बाबतची माहिती सरकारच्या वतीने मंगळवारी संसदेत देण्यात आली.

logo
marathi.freepressjournal.in