पहलगाम हल्ल्याचे दहशतवादी अद्यापही मोकाटच

पहलगाममध्ये २६ निरपराध पर्यटकांची धर्म विचारून निर्घृण हत्या करण्यात आली ते दहशतवादी अद्यापही सापडलेले नाहीत. हल्ल्यात सहभाग असलेल्यांचा एनआयएकडून कसून शोध घेतला जात आहे. पहलगाम येथील हल्ल्यामागे पाच दहशतवादी होते. ज्यात पाकिस्तानच्या तीन जणांचा समावेश आहे. या सगळ्यांची रेखाचित्रे पोलिसांनी आणि तपास यंत्रणांनी जारी केली आहेत.
पहलगाम हल्ल्याचे दहशतवादी अद्यापही मोकाटच
Published on

श्रीनगर : पहलगाममध्ये २६ निरपराध पर्यटकांची धर्म विचारून निर्घृण हत्या करण्यात आली ते दहशतवादी अद्यापही सापडलेले नाहीत. हल्ल्यात सहभाग असलेल्यांचा एनआयएकडून कसून शोध घेतला जात आहे. पहलगाम येथील हल्ल्यामागे पाच दहशतवादी होते. ज्यात पाकिस्तानच्या तीन जणांचा समावेश आहे. या सगळ्यांची रेखाचित्रे पोलिसांनी आणि तपास यंत्रणांनी जारी केली आहेत. या दहशतवाद्यांवर २० लाख रुपयांचं इनामही जाहीर करण्यात आले आहे. या प्रकरणात आत्तापर्यंत १५० हून जास्त स्थानिकांकडे चौकशी करण्यात आली आहे. ज्यांच्यात खेचर चालक, दुकानदार, फोटोग्राफर्स या सगळ्यांचा समावेश आहे.

दुकानदाराची चौकशी

पहलगाम हल्ल्याच्या १५ दिवस आधी एका दुकानदाराने दुकान सुरू केले होते त्याचीही चौकशी एनआयएने केली आहे. हल्ला झाला तेव्हा या दुकानदाराचे दुकान बंद होते. मात्र, या दुकानदाराच्या विरोधात ठोस काहीही आढळून आले नाही, असेही एनआयने म्हटले आहे.

शेकडोंची चौकशी

पहलगाम हल्ल्यानंतर तेथील पोलीस, सुरक्षा दले सक्रिय झाली आहेत. त्यांनी शेकडो जणांना ताब्यात घेऊन चौकशी केली आहे. दहशतवाद्यांचा काही सुगावा लागतो का, याची माहिती घेतली आहे. दोन उद्दिष्ट‌्ये समोर ठेवून आम्ही काम करत आहोत. पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या मागे असलेल्या दहशतवाद्यांचा शोध घेणे आणि ज्यांना हिंसा करायची आहे त्यांना एक कडक संदेश देणे की आम्ही यापुढे असले हल्ले सहन करणार नाही, असे पोलिसांनी म्हटले आहे.

logo
marathi.freepressjournal.in