पाकिस्तानी सेलिब्रिटींच्या सोशल मीडिया खात्यांवर पुन्हा बंदी; केवळ एका दिवसात निर्बंध लागू

बंदी उठवल्यानंतर अवघ्या एकाच दिवसात अनेक पाकिस्तानी कलाकारांच्या सोशल मीडिया खात्यांवरील निर्बंध पुन्हा एकदा लागू करण्यात आले आहेत. भारतातील अनेक प्रसिद्ध पाकिस्तानी कलाकारांची सोशल मीडिया खाती गुरुवारी पुन्हा एकदा ब्लॉक करण्यात आली आहेत.
पाकिस्तानी सेलिब्रिटींच्या सोशल मीडिया खात्यांवर पुन्हा बंदी; केवळ एका दिवसात निर्बंध लागू
Published on

नवी दिल्ली : बंदी उठवल्यानंतर अवघ्या एकाच दिवसात अनेक पाकिस्तानी कलाकारांच्या सोशल मीडिया खात्यांवरील निर्बंध पुन्हा एकदा लागू करण्यात आले आहेत. भारतातील अनेक प्रसिद्ध पाकिस्तानी कलाकारांची सोशल मीडिया खाती गुरुवारी पुन्हा एकदा ब्लॉक करण्यात आली आहेत.

क्रिकेटपटू शाहीद आफ्रिदीसह मावरा होकेन, युमना झैदी, हानिया आमिर आणि फवाद खान यांसारख्या पाकिस्तानी कलाकारांचे इन्स्टाग्राम आणि ट्विटर प्रोफाइल गुरुवार सकाळपासून भारतीय वापरकर्त्यांसाठी उपलब्ध झाली नाहीत, असे वृत्त आहे.

बंदी मागे घेण्यात आल्याची चर्चा

अनेक पाकिस्तानी यूट्युब चॅनेल आणि इन्स्टाग्राम खाती बुधवारपासून भारतात पुन्हा दिसू लागली होती. ही खाती अचानक दिसू लागल्याने चाहत्यांच्या भुवया उंचावल्या होत्या आणि सोशल मीडियावरील ही तथाकथित 'बंदी' गुपचूप मागे घेण्यात आल्याची अटकळ बांधली जात होती. गुरुवारी सकाळपासूनच शाहीद आफ्रिदी, मावरा होकेन, युमना झैदी, हानिया आमिर आणि फवाद खान यांसारख्या कलाकारांचे इन्स्टाग्राम आणि ट्विटर प्रोफाइल भारतीय वापरकर्त्यांसाठी ब्लॉक करण्यात आले.

खाते भारतात उपलब्ध नाही

सध्या इन्स्टाग्रामवर पाकिस्तानी कलाकारांचे प्रोफाइल शोधल्यास "हे खाते भारतात उपलब्ध नाही. आम्ही या मजकुरावर निर्बंध घालण्याच्या कायदेशीर विनंतीचे पालन केले आहे," असा संदेश स्क्रीनवर दिसत आहे. ही बंदी पुन्हा लागू करण्यासंदर्भात सरकारकडून अद्याप कोणतेही अधिकृत निवेदन जारी करण्यात आलेले नाही.

बंदी का होती?

केंद्र सरकारकडून ही बंदी पुन्हा लागू करण्याबाबत अद्याप कोणतेही अधिकृत निवेदन आलेले नाही. सुरुवातीला हे निर्बंध भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढल्यानंतर लागू करण्यात आले होते. विशेषतः, भारताने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळांना लक्ष्य करून राबवलेल्या 'ऑपरेशन सिंदूर' या लष्करी मोहिमेनंतर ही कारवाई झाली होती. पाकिस्तानी कलाकारांनी या कारवाईवर जाहीरपणे टीका केली होती, यावर भारतात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आणि त्यांची सोशल मीडिया खाती ब्लॉक करण्यात आली होती.

logo
marathi.freepressjournal.in