पाकने ड्रोनद्वारे पाठवलेला शस्त्रसाठा दिल्ली पोलिसांकडून जप्त

भारतामध्ये दहशत पसरवण्याचा पाकिस्तानचा डाव दिल्ली पोलिसांनी उधळून लावला आहे. दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेने आंतरराष्ट्रीय शस्त्र तस्करी रॅकेटचा पर्दाफाश केला असून ड्रोनद्वारे तस्करी करण्यात आलेल्या हत्यारांचा साठा जप्त केला आहे.
पाकने ड्रोनद्वारे पाठवलेला शस्त्रसाठा दिल्ली पोलिसांकडून जप्त
Published on

नवी दिल्ली: भारतामध्ये दहशत पसरवण्याचा पाकिस्तानचा डाव दिल्ली पोलिसांनी उधळून लावला आहे. दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेने आंतरराष्ट्रीय शस्त्र तस्करी रॅकेटचा पर्दाफाश केला असून ड्रोनद्वारे तस्करी करण्यात आलेल्या हत्यारांचा साठा जप्त केला आहे.

या तस्करी रॅकेटमध्ये सहभागी असलेल्या चौघांना पोलिसांनी अटकही केली आहे. ड्रोनचा वापर करून ही हत्यारे पंजाब सीमेवरून हिंदुस्थानात आणण्यात आली होती. येथे ती लॉरेन्स बिश्नोई, बंबीहा, गोगी आणि हिमांशु भाऊ या टोळ्यांना पुरवण्यात येणार होती. मात्र तत्पूर्वीच दिल्ली पोलिसांच्या पथकाने ही शस्त्रास्त्रे जप्त केली, अशी माहिती पोलिसांनी दिली. जप्त केलेल्या हत्यारांमध्ये १० विदेशी सेमी-ऑटोमेटिक पिस्तूल, ९२ जिवंत काडतुसांचा समावेश आहे. ही तुर्की बनावटीची पीएक्स ५.७ पिस्तूल असून याचा वापर स्पेशल फोर्स करते. तसेच जप्त केलेल्या हत्यारांमध्ये चिनी बनावटीची पीएक्स ३ ही पिस्तूलही आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

दरम्यान, अटक केलेले आरोपी पंजाब आणि उत्तर प्रदेशचे रहिवासी आहेत. दिल्लीतील रोहिणी परिसरात छापा टाकून पोलिसांनी आरोपींना शस्त्रास्त्रांसह बेड्या ठोकल्या आहेत. सापळा रचून आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांची कसून चौकशी सुरू आहे.

जम्मू-काश्मीरमधून इलेक्ट्रिशियन ताब्यात

दिल्ली स्फोटप्रकरणी जम्मू-काश्मीरमधील एका इलेक्ट्रिशियनला तपास यंत्रणांनी ताब्यात घेतले असून त्याचा जैश-ए-मोहम्मदशी संबंध असल्याचा संशय आहे. राज्य तपास यंत्रणा आणि जम्मू-काश्मीरच्या विशेष ऑपरेशन्स पथकाने ही कारवाई करत पुलवामा येथे काम करणाऱ्या तुफैल अहमद याला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. तो मूळचा श्रीनगरचा रहिवासी असून या कटात त्याचा सहभाग असल्याचे पुरावे आढळले आहेत. णि सोशल मीडिया वापरून त्यांच्या लिंक्सचाही तपास करत आहेत.

logo
marathi.freepressjournal.in