पाकिस्तान एकतर भारतात दिसेल, नाहीतर इतिहासातून नष्ट होईल - योगी आदित्यनाथ

पाकिस्तानचे एकतर भारतात विलीनीकरण होईल किंवा पाकिस्तान इतिहासातून कायमचा नष्ट होईल, असे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी म्हटले आहे.
(संग्रहित छायाचित्र)
(संग्रहित छायाचित्र)
Published on

नवी दिल्ली: पाकिस्तानचे एकतर भारतात विलीनीकरण होईल किंवा पाकिस्तान इतिहासातून कायमचा नष्ट होईल, असे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी म्हटले आहे.

आदित्यनाथ यांनी फाळणीविरोधी स्मृती दिनाच्या निमित्ताने आयोजित लखनौमधील एका कार्यक्रमात पाकिस्तानवर जोरदार हल्लाबोल केला. ते म्हणाले की, जेव्हा आध्यात्मिक जगतात एखाद्याचे वास्तविक स्वरुप नसते, तेव्हा त्यास नष्ट व्हावेच लागेल. मात्र, त्यासाठी आपल्यालाही तयार असावेच लागेल. आपल्याला त्या चुकांवर विचार करावा लागेल, ज्यामुळे विदेशातील दृष्ट शक्तींना भारतात घुसणे आणि आपल्या देशातील पवित्र स्थळांवर हल्ला करण्याची संधी मिळते. भारताची अखंडता आणि संस्कृती अबाधित ठेवण्यासाठी आपणास ते करावेच लागेल. बांगलादेशमध्ये आज दीड कोटींपेक्षा जास्त हिंदू जीव वाचवण्यासाठी धडपड करत आहेत. मात्र, जगाचे तोंड बंद आहे. देशातील धर्मनिरपेक्षवाद्यांची तोंडे बंद आहेत, कारण आम्ही कमजोर आहोत. आपली व्होट बँक आपल्यापासून दूर जाईल, या हेतुने हे सर्व जण गप्प आहेत, अशी टीका त्यांनी विरोधकांवर केली.

logo
marathi.freepressjournal.in