पाकिस्तानी हेरगिरी रॅकेट : ‘एनआयए’चे ७ राज्यांतील १६ ठिकाणी छापे

पाकिस्तानातील हेरगिरी रॅकेटमार्फत संरक्षणविषयक गोपनीय माहिती फुटल्याच्या प्रकरणाच्या चौकशीचा भाग म्हणून राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) गुरुवारी सात राज्यांमधील १६ ठिकाणी छापे टाकले.
पाकिस्तानी हेरगिरी रॅकेट : ‘एनआयए’चे ७ राज्यांतील १६ ठिकाणी छापे
(संग्रहित छायाचित्र)
Published on

नवी दिल्ली : पाकिस्तानातील हेरगिरी रॅकेटमार्फत संरक्षणविषयक गोपनीय माहिती फुटल्याच्या प्रकरणाच्या चौकशीचा भाग म्हणून राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) गुरुवारी सात राज्यांमधील १६ ठिकाणी छापे टाकले.

भारतामध्ये हेरगिरी करण्यासाठी ज्यांना निधी मिळाला, त्या संशयितांशी संबंधित ठिकाणांवर छापे टाकण्यात आल्याचे ‘एनआयए’च्या निवेदनामध्ये म्हटले आहे. गुजरात, कर्नाटक, केरळ, तेलंगण, उत्तर प्रदेश, बिहार आणि हरयाणातील १६ ठिकाणांवर छापे टाकून ‘आयएसआय’च्या हेरगिरी रॅकेटप्रकरणी कसून तपासणी करण्यात आली.

नौदलाशी संबंधित माहिती फुटल्याप्रकरणी चौकशी

या छाप्यांदरम्यान ‘एनआयए’ने २२ भ्रमणध्वनी आणि अन्य संवेदनक्षम कागदपत्रे हस्तगत केले. भारताविरुद्धच्या कटाचा एक भाग म्हणून भारतीय नौदलाशी संबंधित संवेदनक्षम माहिती फुटल्या प्रकरणाची चौकशी केली जात आहे. ‘एनआयए’ने जुलै २०२३ मध्ये दोन आरोपींविरुद्ध आरोपपत्र दाखल केले असून त्यामध्ये मीर बलाज खान या पाकिस्तानातील एका फरार नागरिकाचा समावेश आहे. खान आणि आकाश सोळंकी हे हेरगिरी रॅकेटमध्ये गुंतले असल्याचे चौकशीतून निष्पन्न झाले आहे.

logo
marathi.freepressjournal.in