पाकिस्तान दिवाळखोरीच्या मार्गावर; पाकचे संरक्षण मंत्री ख्वाजा असिफ यांचा इशारा

देशात आर्थिक संकट घोंघावत असून त्यातून लवकरात लवकर सुटका होणे शक्य नाही. या अडचणीतून मात करायला किमान दोन वर्षे लागू शकतात. सरकारने आर्थिक आघाडीवर आता काम करायला सुरुवात केली आहे.
पाकिस्तान दिवाळखोरीच्या मार्गावर; पाकचे संरक्षण मंत्री ख्वाजा असिफ यांचा इशारा

इस्लामाबाद : आर्थिक गर्तेत सापडलेला पाकिस्तान दिवाळखोरीच्या मार्गावर आहे, असा इशारा पाकचे संरक्षण मंत्री ख्वाजा असिफ यांनी दिला. किरकोळ, घाऊक विक्रेते कर देण्यासाठी टाळाटाळ करत आहेत. करचोरी वाढल्याने देश दिवाळखोरीच्या मार्गावर आला आहे, असे ते म्हणाले.

देशात आर्थिक संकट घोंघावत असून त्यातून लवकरात लवकर सुटका होणे शक्य नाही. या अडचणीतून मात करायला किमान दोन वर्षे लागू शकतात. सरकारने आर्थिक आघाडीवर आता काम करायला सुरुवात केली आहे. देशात करविषयक खटले वाढले आहे. त्यात सरकारच्या कराचे २.६ लाख कोटी रुपये कज्जेदलालीत अडकले आहेत. देशातील न्यायालय व प्रशासन हे आपले काम करण्याऐवजी ते राजकारणात व्यस्त आहेत, अशी टीका त्यांनी केली.

पाकमध्ये पेट्रोल २८९ रुपये

दरम्यान, शाहबाज शरीफ सरकारने पेट्रोलच्या दरात मोठी वाढ केली. पेट्रोलचे दर ९.६६ रुपयांनी वाढून ते २८९.४१ रुपये झाले आहेत.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in