पान मसाला, गुटखा कंपन्यांना केंद्र सरकारकडून दिलासा; विशेष नोंदणी अंमलबजावणी, रिटर्नला १५ मेपर्यंत मुदतवाढ

पान मसाला आणि तंबाखू उत्पादनांच्या उत्पादकांसाठी जीएसटी नियमांच्या अंमलबजावणीसाठी अशा व्यवसायांची नोंदणी, रेकॉर्ड-कीपिंग आणि मासिक फाइलिंगची दुरुस्तीसाठी ही मुदतवाढ देण्यात आली.
पान मसाला, गुटखा कंपन्यांना केंद्र सरकारकडून दिलासा; विशेष नोंदणी अंमलबजावणी, रिटर्नला १५ मेपर्यंत मुदतवाढ
Published on

नवी दिल्ली : सरकारने पान मसाला, गुटखा उत्पादक आणि तत्सम तंबाखू उत्पादनाची नोंदणी आणि मासिक रिटर्न फाइलिंगसाठी विशेष प्रक्रिया लागू करण्याची अंतिम मुदत १५ मे पर्यंत वाढवली आहे. जानेवारीच्या सुरुवातीला, केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमाशुल्क मंडळाने (सीबीआयसी) १ एप्रिल २०२४ पासून नवीन नोंदणी आणि मासिक रिटर्न भरण्याची प्रक्रिया सुरू करण्याची घोषणा केली होती.

पान मसाला आणि तंबाखू उत्पादनांच्या उत्पादकांसाठी जीएसटी नियमांच्या अंमलबजावणीसाठी अशा व्यवसायांची नोंदणी, रेकॉर्ड-कीपिंग आणि मासिक फाइलिंगची दुरुस्तीसाठी ही मुदतवाढ देण्यात आली. पान मसाला, गुटखा आणि तत्सम तंबाखू उत्पादने उत्पादकांनी त्यांच्या पॅकिंग यंत्रसामग्रीची जीएसटी अधिकाऱ्यांकडे नोंदणी न केल्यास त्यांना १ लाख रुपयांपर्यंत दंड भरावा लागेल, अशी दुरुस्ती करणाऱ्या वित्त विधेयक २०२४ द्वारे जीएसटी कायद्यातही सुधारणा करण्यात आली. त्याची अंमलबजावणी १ एप्रिलपासून लागू होणार होती.

logo
marathi.freepressjournal.in