पंकजांच्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याला, ईपीएफओ नोटीस

जीएसटी विभागानेही कारखान्याला १९ कोटी थकीत असल्याने नोटीस बजावली होती.
पंकजांच्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याला, ईपीएफओ नोटीस
Published on

बीड : भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या वैद्यनाथ साखर कारखान्याने कर्मचाऱ्यांचा पीएफ न भरल्यामुळे कर्मचारी भविष्य निर्वाह निधी कार्यालयाने (ईपीएफओ) नोटीस पाठवली आहे. कारखान्यातील कर्मचाऱ्यांचा ६१ लाख ४७ हजार रुपयांचा थकीत पीएफ न भरल्याने शुक्रवारी ईपीएफओ कार्यालयाने ही नोटीस बजावली आहे. सध्या कारखाना बंद अवस्थेत असून यात काहीच लोक काम करत आहेत. या कर्मचाऱ्यांच्या पीएफची रक्कम जमा न केल्यामुळे कारखान्याला नोटीस आली आहे. ही नेहमीची प्रक्रिया असून कर्माचाऱ्यांच्या पीएफची रक्कम टप्प्याटप्प्याने भरणार आहोत, अशी प्रतिक्रिया कारखान्याने दिली आहे. यापूर्वी जीएसटी विभागानेही कारखान्याला १९ कोटी थकीत असल्याने नोटीस बजावली होती.

logo
marathi.freepressjournal.in