नवी दिल्ली: भारताने दहशतवादी जाहीर केलेला आणि बंदी आणलेल्या सिख फॉर जस्टीस एसएफजे संघटनेचा संस्थापक गुरपतवंतसिंग पन्नूम यांनी शिखांनी १९ नोव्हेंबर पासून एअर इंडियाच्या विमानातून प्रवास करु नये कारण त्यांचा जीव धोक्यात येउ शकतो असे आवाहन केले आहे. कारण या तारखेपासून ही संघटना एअरइंडियाची विमानसेवा चालू देणार नाही. तेव्हा शिखांनी १९ तारखेपासून एअरइंडियाच्या विमानातून प्रवास करु नये अशी विनंती वजा आवाहन पन्नूम याने एका व्हिडिओच्या माध्यमातून केले आहे. तसेच १९ नोव्हेंबर रोजी दिल्लीचा इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ बंद राहाणार आहे. याच दिवशी क्रिकेट विश्वचषकाचा अंतिम सामना देखील आहे. याच दिवशी वर्ल्ड टेरर कप सामना खेळला जाणार आहे अशी धमकी त्याने दिली आहे.