
संसदेत आज झालेल्या गदारोळामुळे दोन्ही सभागृहांचे कामकाज ठप्प झाले. अदानी प्रकरणावरून संसदेत मोठा गदारोळ सुरू झाला. यानंतर दोन्ही सभागृहांचे कामकाज दोन वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले. राज्यसभेचे कामकाज दुपारी 2.30 वाजेपर्यंत, तर लोकसभेचे कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले आहे.
सभागृहाचे कामकाज सुरू होण्यापूर्वी काँग्रेस आणि अन्य १५ विरोधी पक्षांच्या नेत्यांमध्ये बैठक झाली. ज्यामध्ये हिंडेनबर्ग रिसर्चने अदानी समूहावर केलेल्या आरोपांवर चर्चा करण्यात आली आणि दोन्ही सभागृहात या प्रकरणाच्या चौकशीची मागणी करण्याचा मुद्दा उपस्थित करण्यावर भर देण्यात आला. राज्यसभेत विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी घेतलेल्या बैठकीत काँग्रेस, द्रमुक, आम आदमी पार्टी, भारत राष्ट्र समिती, समाजवादी पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, जनता दल (संयुक्त) आणि इतर अनेक विरोधी पक्षांचे नेते सहभागी झाले होते.