

नवी दिल्ली : लोकसभेतील सदस्य संख्या ८१६ पर्यंत वाढवून महिला आरक्षण लागू करण्याचा मार्ग मोकळा करण्यासाठी संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन १६ एप्रिलपासून तीन दिवसांसाठी पुन्हा भरविण्यात येणार आहे. सरकारने विरोधी पक्षांना १६ एप्रिलपासून सुरू होणाऱ्या तीन दिवसीय सत्राबाबत प्राथमिक माहिती दिल्याचे समजते.
संसदीय कामकाज मंत्री किरण रिजिजू यांनी गुरुवारी राज्यसभेत बोलताना आगामी सत्राचे संकेत दिले होते. संसदेच्या अधिकृत वेळापत्रकानुसार, गुरुवारी सभागृहाचे कामकाज अनिश्चित काळासाठी तहकूब होणार होते. मात्र, आता प्रस्तावित विधेयकासाठी हे विशेष सत्र बोलावण्यात येत आहे.
काही महत्त्वाची विधेयके आणि मुद्द्यांवर विचारविनिमय करण्यासाठी सभागृह लवकरच पुन्हा भरेल. आगामी दोन-तीन आठवड्यांत आम्ही एक अत्यंत महत्त्वाचे विधेयक मांडणार आहोत, ज्याची कल्पना आम्ही विरोधी पक्षांनाही दिली आहे, असे रिजिजू म्हणाले.