संसद टीव्हीचे राहुल गांधी यांच्या भाषणावर लक्ष कमी - काँग्रेसचा आरोप

मोदी सरकारला नेमकी कशाची भीती वाटते, असा सवालही रमेश यांनी उपस्थित केला
संसद टीव्हीचे राहुल गांधी यांच्या भाषणावर लक्ष कमी - काँग्रेसचा आरोप

नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी बुधवारी लोकसभेत केलेल्या भाषणावर संसद टीव्ही या वाहिनीने फारसे लक्ष दिले नाही, असा आरोप काँग्रेसच्या वतीने करण्यात आला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारविरुद्ध दाखल करण्यात आलेल्या अविश्वास ठरावावरील चर्चेच्या दरम्यान राहुल यांनी बुधवारी लोकसभेत भाषण केले. त्यांचे भाषण १२ वाजून ९ मिनिटांनी सुरू झाले आणि १२ वाजून ४६ मिनिटांनी संपले. या एकूण ३७ मिनिटांपैकी १४ मिनिट ३७ सेकंद संसद टीव्हीचा कॅमेरा राहुल यांच्या दिशेने होता. म्हणजेच संसद टीव्हीने भाषणाच्या केवळ ४० टक्के वेळच राहुल यांच्यावर फोकस ठेवला, असा आरोप काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी केला आहे. संसदेच्या कामकाजाचे अधिकृत प्रसारण करणाऱ्या संसद टीव्हीवर राहुल यांना पुरेसा वेळ न देण्यात आला नाही. मोदी सरकारला नेमकी कशाची भीती वाटते, असा सवालही रमेश यांनी उपस्थित केला.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in