बिहारच्या भागलपूरमध्ये काम सुरु असताना पुलाचा भाग कोसळला; वर्षभरात एकाच पुलाबाबत दुसरी घटना

खगरिया आणि भागलपूर या जिल्ह्यांना जोडणारा सेतू म्हणून देखील या पुलाला ओखळल जात होतं.
बिहारच्या भागलपूरमध्ये काम सुरु असताना पुलाचा भाग कोसळला; वर्षभरात एकाच पुलाबाबत दुसरी घटना

बिहारमधील गंगा नदीवरील बांधकाम सुरु असलेल्या पुलाचा एक भाग कोसळ्याची घटना घडली आहे. अगुवानी सुलतानगंज पूल म्हणून हा पूल ओळखला जात होता. खगरिया आणि भागलपूर या जिल्ह्यांना जोडणारा सेतू म्हणून देखील या पुलाला ओखळल जात होतं. या घटनेत आतापर्यंत कोणतीही जीवितहानी नसल्याचं सांगितलं जात आहे. ही घटना घडल्याने बांधकाम प्रकल्पाच्या प्रगती आणि सुरक्षेबाबत चिंता निर्माण झाली आहे. त्याला कारण देखील तसंच आहे.

या पुलाची कोसळण्याची ही काही पहिली घटना नाही. याआधी देखील बांधकाम सुरु असताना या पुलाचा भाग कोसळला होता. त्यामुळे या पुलाचा भाग कोसळण्याची ही दुसरी घटना आहे. गेल्यावर्षी या पुलाचा भाग कोसळला होता. 2022 च्या एप्रिल महिन्यात याच पुलाचा काही भाग कोसळला होता. जोरदार वारा आणि पावसामुळे हा भाग कोसळला असल्याचं सांगितलं गेलं होतं. त्यावेळी जेडीयू आमदार ललित नारायण मंडल यांनी "याबाबत मुख्यमंत्र्यांना कळवले असून चौकशी सुरु केली जाईल. बांधकामासाठी निकृष्ट दर्जाचे साहित्य वापल्याचे दिसते." असं सांगितलं होते. मात्र, मागील वर्षी घडलेल्या घटनेवरुन कोणतीही खबरदारी प्रशासनाने घेतलेली दिसत नाही. कारण त्याच पुलाच्या बाबतीत एका वर्षाच्या कालावधीत पुलाचा भाग कोसळ्याची ही दुसरी घटना घडली आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in