भारत टेक्स २०२४ साठी आघाडीच्या कंपन्यांशी भागीदारी

भारत सरकारच्या पाठिंब्याने ११ कॉन्सोर्टियम ऑफ टेक्स्टाइल एक्स्पोर्ट प्रमोशन कौन्सिल्सकडून हा कार्यक्रम आयोजित केला आहे.
भारत टेक्स २०२४ साठी आघाडीच्या कंपन्यांशी भागीदारी
Published on

नवी दिल्ली : ‘भारत टेक्स २०२४’ या भारताच्या प्रतिष्ठित जागतिक वस्त्रोद्योग उपक्रमाचे आयोजन नवी दिल्ली येथे २६-२९ फेब्रुवारी २०२४ या काळात भारत मंडपम आणि यशोभूमी येथे केले जाणार आहे. भारत टेक्स २०२४ ला उत्तर प्रदेशला ‘भागीदार राज्य’ म्हणून आणि मध्य प्रदेशला ‘सहाय्यक भागीदार राज्य’ म्हणून घोषित केले आहे.

भारत टेक्स २०२४ मध्ये आदित्य बिर्ला ग्रुपला ‘प्लॅटिनम पार्टनर’ म्हणून, रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडला ‘गोल्ड पार्टनर’ म्हणून अरविंद लि., इंडोरामा व्हेंचर्स, ट्रायडंट ग्रुप आणि वेलस्पन लिव्हिंग यांना ‘सिल्व्हर पार्टनर' म्हणून, पीडीएस लिमिटेडला फॅशन पार्टनर म्हणून, चार्जस पीसीसीला ‘असोसिएट पार्टनर’ म्हणून तर शाहीला ‘सस्टेनिबिलीटी पार्टनर' म्हणून आणि डब्ल्यूजीएसएनला ‘ट्रेंड पार्टनर' म्हणून सहभागी करून घेतले आहे. वस्त्रोद्योग मंत्रालय, भारत सरकारच्या पाठिंब्याने ११ कॉन्सोर्टियम ऑफ टेक्स्टाइल एक्स्पोर्ट प्रमोशन कौन्सिल्सकडून हा कार्यक्रम आयोजित केला आहे.

logo
marathi.freepressjournal.in