बांगलादेशात प्रवासी रेल्वेला आग - महिला आणि मुलासह ४ जणांचा मृत्यू

बांगलादेशात आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बराच हिंसाचार सुरू आहे. तेथे ७ जानेवारी रोजी निवडणूक होत आहे.
बांगलादेशात प्रवासी रेल्वेला आग - महिला आणि मुलासह ४ जणांचा मृत्यू
PM
Published on

ढाका : बांगलादेशची राजधानी ढाक्यात मंगळवारी अज्ञात व्यक्तींनी प्रवासी रेल्वेला आग लावली. त्यात एक महिला आणि तिच्या अल्पवयीन मुलासह किमान चार जण ठार झाले. गेल्या महिनाभरात रेल्वेवर झालेला हा पाचवा आणि सर्वात प्राणघातक हल्ला होता.

बांगलादेशात आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बराच हिंसाचार सुरू आहे. तेथे ७ जानेवारी रोजी निवडणूक होत आहे. त्यावर बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी (बीएनपी) या मुख्य विरोधी पक्षाने बहिष्कार टाकला आहे. मंगळवारी विरोधकांनी बंदचे आवाहन केले होते. त्या दरम्यान ही घटना घडली आहे. ढाक्याकडे जाणारी मोहनगंज एक्स्प्रेस विमानतळ स्थानकावरून सुटल्यावर काही अज्ञातांनी तिच्या तीन डब्यांना आग लावली. रेल्वे पुढे तेजगाव स्थानकावर थांबवण्यात आली. या आगीत एक महिला आणि तिच्या मुलासह ४ जण ठार झाले.

logo
marathi.freepressjournal.in