मोदींच्या आईंचा व्हिडीओ समाजमाध्यमांवरून हटवा; पाटणा हायकोर्टाचे काँग्रेसला आदेश

पंतप्रधान नरेंद्र मोदी व त्यांच्या मातोश्रींचा एआयद्वारे बनवलेला व्हिडीओ समाजमाध्यमांवरून हटवण्याचे आदेश पाटणा उच्च न्यायालयाने बुधवारी काँग्रेसला दिले.
मोदींच्या आईंचा व्हिडीओ समाजमाध्यमांवरून हटवा; पाटणा हायकोर्टाचे काँग्रेसला आदेश
Published on

पाटणा : पंतप्रधान नरेंद्र मोदी व त्यांच्या मातोश्रींचा एआयद्वारे बनवलेला व्हिडीओ समाजमाध्यमांवरून हटवण्याचे आदेश पाटणा उच्च न्यायालयाने बुधवारी काँग्रेसला दिले.

बिहार विधानसभेची निवडणूक तोंडावर आलेली असताना सत्ताधारी व विरोधक एकमेकांवर जाहिराती, भाषणे, मोर्चे आणि इतर मार्गांनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करीत आहेत. समाजमाध्यमांवरील पोस्ट, मिम्स, व्हिडीओचाही वापर केला जात आहे. अशातच बिहार काँग्रेसने त्यांच्या सोशल मीडिया हँडलवरून मोदी आणि त्यांच्या मातोश्रींचा एआयद्वारे (आर्टीफिशियल इंटेजिन्स) तयार केलेला व्हिडीओ शेअर करण्यात आल्याने राजकारण तापले आहे.

या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, मोदी यांची आई त्यांच्या स्वप्नात येते आणि त्यांच्यावर ओरडते. या व्हिडीओनंतर भारतीय जनता पार्टीने काँग्रेसवर टीका केली आहे. अशा व्हिडीओद्वारे काँग्रेसने खालचा स्तर गाठल्याची टिप्पणी भाजपाने केली आहे. तसेच सदर व्हिडीओ कुणाचाही अनादर करण्यासाठी तयार केलेला नसल्याचे काँग्रेसने म्हटले आहे.

दरम्यान, हे प्रकरण न्यायालयात पोहोचले असता काँग्रेसविरोधात दाखल केलेल्या याचिकेवर पाटणा उच्च न्यायालयात बुधवारी सुनावणी झाली. यावेळी न्यायालयाने मोदी व त्यांच्या मातोश्रींचा एआयद्वारे बनवलेला व्हिडीओ समाजमाध्यमांवरून हटवण्याचे आदेश दिले.

बिहार काँग्रेसने साहब के सपनों में आईं “माँ” या ओळींसह ‘एक्स’वर पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये, पंतप्रधानांच्या मातोश्री मोदींवर निवडणुकीत मते मिळवण्यासाठी त्यांचा वापर केल्या बद्दल टीका करत आहेत.

logo
marathi.freepressjournal.in