नॅशनल हेरॉल्ड चौकशी प्रकरणी पवन बंसल ईडीसमोर हजर

नॅशनल हेराल्डकंपनीचा मालकी हक्क असोसिएटेड जर्नल लिमिटेड म्हणजे एजेएल कंपनीकडे होता
नॅशनल हेरॉल्ड चौकशी प्रकरणी पवन बंसल ईडीसमोर हजर

नवी दिल्ली: गांधी कुटुंबियांचा संबंध असलेल्या नॅशनल हेराल्ड खटल्यात कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते पवन बंसल मंगळवारी चौकशीसाठी ईडीच्या कार्यालयात हजर झाले. या आधी देखील बंसल यांची याच प्रकरणी चौकशी करण्यात आली होती.

प्राप्त माहितीनुसार २०२२ साली कॉंग्रेस नेते व माजी केंद्रीय मंत्री पवन बंसल यांची इडीने चौकशी केली होती. तसेच कॉंग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांना देखील चौकशी साठी बोलावले होते. त्यांची तर दोन तासांपेक्षा अधिक वेळ चौकशी करण्यात आली. नॅशनल हेराल्डकंपनीचा मालकी हक्क असोसिएटेड जर्नल लिमिटेड म्हणजे एजेएल कंपनीकडे होता. या कंपनीकडे हिंदी भाषेतील नवजीवन व उर्दू कौमी आवाज या वर्तमान पत्रांचे देखील मालकी हक्क होते. १९५६ साली एजेएल अव्यवसायिक कंपनी गटात सामील करुन करमुक्त करण्यात आले होते. २००८ साली एजेएलची सर्व प्रकाशने बरखास्त करण्यात आली आणि कंपनीवर ९० कोटी रुपये कर्ज झाले. नंतर कॉंग्रेस नेतृत्वाने यंग इंडियन प्रायव्हेट लिमिटेड नावाची एक नवी अव्यवसायिक कंपनी स्थापन केली. या कंपनी सोनिया गांधी, राहुल गांधी, सह मोतीलाल व्होरा, सुमन दुबे, ऑस्कर फर्नांडीस, आणि सॅम पित्रोदा ही मंडळी संचालक होते. कंपनीचे ७६ टक्के भाग भांडवल सोनिया आणि राहुल गांधी यांच्याकडे होते. तर उर्वरित २४ टक्के समभाग इतर संचालकांकडे होते. कॉंग्रेसने या कंपनीला कर्ज म्हणून ९० कोटी रुपये दिले. नंतर कॉंग्रेसच्या कंपनीने एजेएल कंपनी खरेदी केली. भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी २०१२ साली एक याचिका दाखल करुन कॉंग्रेसच्या नेत्यांवर या प्रकरणात घोटाळा केल्याचा आरोप केला होता.

logo
marathi.freepressjournal.in