काँग्रेस नेत्याला पोलिसांकडून विमानतळावर अटक आणि गोंधळ; नेमकं प्रकरण काय?

काँग्रेस नेत्याला पोलिसांकडून विमानतळावर अटक आणि गोंधळ; नेमकं प्रकरण काय?

काँग्रेस नेत्याला दिल्ली पोलिसांनी अटक केली म्हणून काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी विमानतळावरच केले धरणे आंदोलन
Published on

आज दिल्ली विमानतळावर मोठा ड्रामा पाहायला मिळाला. काँग्रेसच्या राष्ट्रीय अधिवेशनासाठी निघालेल्या काँग्रेस नेते पवन खेरा यांना दिल्ली पोलिसांनी उड्डाण होण्याआधीच विमानतळावरून अटक केली. यावेळी आसाम पोलिसांच्या शिफारशीवरून ही अटक झाल्याचा दावा दिल्ली पोलिसांनी केला. मात्र, यावेळी मोठ्या घडामोडी पाहायला मिळाल्या. यावेळी प्रवाशांना त्या विमानातून उतरवून दुसऱ्या विमानामध्ये पाठवण्यात आले. तर, काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांनी यावेळी धरणे आंदोलनही केले.

नेमकं काय घडलं?

मिळालेल्या माहितीनुसार, दिल्लीमध्ये विमानतळावर प्रवाशांनी भरलेले दिल्ली ते रायपूरचे विमान रद्द करण्यात आले. कारण, दिल्ली पोलिसांनी अचानकपणे विमानतळावर येत काँग्रेस नेते पवन खेरा (Pawan Khera) यांना अटक केली. ते इतर काँग्रेस नेत्यांसोबत रायपूरला काँग्रेसच्या राष्ट्रीय अधिवेशनासाठी जात होते. दिल्ली पोलिसांनी आसाम पोलिसांच्या शिफारशीवरून ही अटक केल्याचा दावा केला आहे. त्यानंतर मात्र, वातावरण चांगलेच तापले होते.

काँग्रेस नेते पवन खेरा यांना विमानामधून अटक झाली. यावेळी संबंधित इंडिगो विमान कंपनीने निवेदन जारी करत, प्रवाशांना दिल्ली-रायपूर विमानातून खाली उतरवण्यात आले. विमान प्राधिकरणाच्या निर्देशानुसार, आम्ही आदेशाचे पालन करत आहोत, असे इंडिगोने सांगितले. सदर विमान रद्द करून इतर प्रवाशांना दुसऱ्या विमानाची सोय करून दिली. तसेच प्रवशांची गैरसोय झाल्याबद्दल माफीही मागण्यात आली. सदर फ्लाइट रद्द केली आणि प्रवाशांना दुसऱ्या विमानाची व्यवस्था करून दिली.

यावेळी पवन खेरा यांनी सांगितले की, "मी विमानात बसलो होतो, तेव्हा मला सामान तपासायचे आहे, असे सांगण्यात आले. माझ्याकडे हँडबॅगसोडून दुसरे काहीही नव्हते, त्यानंतर ते म्हणाले की, पोलिस उपायुक्तांना तुम्हाला भेटायचे आहे, म्हणून खाली उतरण्यास सांगितले. मला रायपूरला जाण्यापासून का रोखले? हेच समजत नाही" असे विधान त्यांनी केली.

logo
marathi.freepressjournal.in