'आरबीआय'ने बंदी घातलेली पेटीएम कंपनी अंबानींकडे?

मुकेश अंबानींची एनबीएफसी कंपनी जिओ फायनान्शिअल कंपनीचे शेअर्स गगनाला भिडले आहेत. आज कंपनीचे शेअर १५ टक्क्यांहून अधिक वाढून विक्रमी पातळीवर पोहोचले.
'आरबीआय'ने बंदी घातलेली पेटीएम कंपनी अंबानींकडे?

नवी दिल्ली : काही दिवसांपूर्वीच भारतीय रिझर्व्ह बँकेने पेटीएम पेमेंट बँकेवर बंदी घातली आहे. हीच कंपनी आता रिलायन्स उद्योग समूहाचे प्रमुख मुकेश अंबानी विकत घेण्याच्या तयारीत आहेत. ही बातमी पसरताच मुकेश अंबानींची एनबीएफसी कंपनी जिओ फायनान्शिअल कंपनीचे शेअर्स गगनाला भिडले आहेत. आज कंपनीचे शेअर १५ टक्क्यांहून अधिक वाढून विक्रमी पातळीवर पोहोचले.

या प्रकरणाची माहिती असलेल्या फिनटेक आणि बँकिंग क्षेत्रातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचा हवाला देत मीडिया रिपोर्ट्समध्ये दावा केला जातोय की, वन ९७ कम्युनिकेशन्स ही पेटीएमची मालकी असलेली कंपनी आपला वॉलेट व्यवसाय विकण्यासाठी जिओ फायनान्शियल आणि एचडीएफसी बँकेशी बोलणी करत आहे. रिपोर्टनुसार, गेल्या नोव्हेंबरपासून विजय शेखर शर्मा यांची टीम जिओ फायनान्शिअलशी बोलणी करत होती. तर, आरबीआयने पेटीएम पेमेंट्स बँकेवर बंदी घालण्यापूर्वीच एचडीएफसी बँकेशीही चर्चा सुरू झाली होती.

बीएसईच्या आकडेवारीनुसार, जिओ फायनान्शियलचे शेअर १५ टक्क्यांनी वधारले आहेत. दुपारी अडीच वाजता १५ टक्क्यांच्या वाढीसह २९४ रुपयांवर व्यवहार करत आहेत. गेल्या आठवड्यात, शुक्रवारी कंपनीचे शेअर्स २५३.७५ रुपयांवर बंद झाले होते. म्हणजे, सध्या या शेअरमध्ये ४० रुपयांहून अधिकची वाढ नोंदवली गेली आहे. सध्या कंपनीचे मार्केट कॅप १.८३ लाख कोटी रुपयांच्या पुढे गेले आहे.

आरबीआयने पेटीएम पेमेंट बँकेला ग्राहकांच्या खात्यात ठेव किंवा क्रेडिट स्वीकारण्यास बंदी घातल्यानंतर पेटीएम संकटात सापडले आहे. कथित मनी लाँड्रिंग आणि केवायसी उल्लंघनामुळे पेटीएमचा बँकिंग परवाना रद्द करण्याचा विचार करत आहे. या युनिटचा वापर मनी लाँड्रिंगसाठी होत असल्याचा संशय सुरक्षा यंत्रणांना आहे. आरबीआयच्या आदेशानंतर पेटीएमचे शेअर्स अवघ्या ३ दिवसांत ४२ टक्क्यांहून अधिक घसरले आहेत.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in