मेहबुबा मुफ्तींच्या कारला भीषण अपघात; ओमर अब्दुल्ला यांनी केली चौकशीची मागणी

दुर्घटनेवेळी मुफ्ती या कारमध्येच होत्या. सुदैवाने त्यांना कोणतीही दुखापत झालेली नाही. मात्र, त्यांच्या कारचालकाच्या पायाला किरकोळ दुखापत झाल्याचे सांगितले जात आहे.
मेहबुबा मुफ्तींच्या कारला भीषण अपघात; ओमर अब्दुल्ला यांनी केली चौकशीची मागणी

जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री आणि पीडीपी प्रमुख मेहबूबा मुफ्ती यांच्या कारला आपघात झाला आहे. जम्मू-काश्मीरच्या अनंतनागमध्ये ही दुर्घटना घडल्याची माहिती आहे. यात मुफ्ती यांच्या कारच्या पुढील भागाचे मोठे नुकसान झाले आहे. दुर्घटनेवेळी मुफ्ती या कारमध्येच होत्या. सुदैवाने त्यांना कोणतीही दुखापत झालेली नाही. मात्र, त्यांच्या कारचालकाच्या पायाला किरकोळ दुखापत झाल्याचे सांगितले जात आहे.

मुफ्ती या अनंतनाग आग दुर्घटनाग्रस्तांना भेटायला जात असताना संगमजवळ त्यांचे वाहन एका कारला धडकल्याने हा अपघात घडला. या घटनेनंतर जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी या अपघाताच्या चौकशीची मागणी केली आहे.

अपघातानंतर मेहबुबा मुफ्ती यांनी माध्यमांशी संवाद साधाल आहे. जे काही महत्त्वाचे आहे त्यावर चर्चा झाली पाहिजे, असे मुफ्ती म्हणाल्या. तसेच, अनंतनाग आगीच्या घटनेबाबत बोलताना त्यांनी जम्मू-काश्मीर सरकारने बाधित लोकांना मदत करावी, वन विभागाने बाधित लोकांना त्यांच्या घरांच्या पुनर्बांधणीसाठी ना हरकत प्रमाणपत्र (एनओसी) द्यावे, अशी मागणी केली आहे.

logo
marathi.freepressjournal.in