लोकांना सोपा रेल्वे प्रवास हवा आहे की, 'शहेनशहा'च्या पुतळ्यासह सेल्फी? राहुल गांधींचा सरकारला सवाल

रेल्वे स्थानकांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आकाराच्या कटआउटसह सेल्फी बूथ उभारल्याबद्दल काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी शनिवारी टीकास्त्र सोडले.
लोकांना सोपा रेल्वे प्रवास हवा आहे की, 
'शहेनशहा'च्या पुतळ्यासह सेल्फी? राहुल गांधींचा सरकारला सवाल

नवी दिल्ली : रेल्वे स्थानकांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आकाराच्या कटआउटसह सेल्फी बूथ उभारल्याबद्दल काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी शनिवारी टीकास्त्र सोडले. लोकांना सहजसोपा रेल्वे प्रवास हवा आहे की शहेनशाहाच्या पुतळ्यासह चित्र असा सवाल त्यांनी केला.

एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये राहुल गांधी यांनी ही टीका केली आहे. यात ते म्हणाले की, भारतीय रेल्वेच्या गरीबों की सवारीच्या प्रत्येक वर्गाचे भाडे वाढवण्यात आले आहे. अगदी वृद्धांना देण्यात आलेली भाडे सवलतही मागे घेण्यात आली आहे. प्लॅटफॉर्म तिकिटांच्या किमती वाढवण्यात आल्या आहेत आणि खाजगीकरणाचा दरवाजा उघडण्यात आला आहे. ते म्हणाले की, सेल्फी स्टँड बनवण्यासाठी जनतेच्या कष्टाच्या पैशातून हिसकावले जाणारे हे पैसे होते का? भारतातील जनतेला काय हवे आहे? स्वस्त गॅस सिलिंडर आणि सोपा रेल्वे प्रवास? की 'शहेनशाहाचा पुतळा' असलेले चित्र?’

काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी मोदींच्या छायाचित्रांसह रेल्वे स्थानकांवर सेल्फी बूथ उभारणे हा करदात्यांच्या पैशाचा निव्वळ अपव्यय आहे, तर विरोधी राज्ये मनरेगा निधीची वाट पाहत आहेत, असे सांगितल्यानंतर गांधींनी आता सरकारवर हल्ला केला. खर्गे यांनी माहितीचा अधिकार (आरटीआय) कायद्यांतर्गत प्राप्त केलेल्या उत्तराची एक प्रत देखील सामायिक केली होती मध्य रेल्वेच्या अंतर्गत स्थानकांची यादी दिली होती. त्यात जिथे तात्पुरते आणि कायमस्वरूपी सेल्फी बूथ स्थापित केले गेले आहेत, त्याचे तपशील होते.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in