...आणि त्या दोघींनी एकमेकींना मिठी मारली

रामजन्मभूमी आंदोलनातील ते सगळे क्षण त्यांच्या डोळ्यासमोरून तरळून गेले असतील.
...आणि त्या दोघींनी एकमेकींना मिठी मारली

सोमवारी अयोध्येतील राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्ताने हे विखुरलेले नेते एकत्र आले, त्यावेळी वातावरण भावनिक होणं स्वाभाविक आहे. ९० च्या दशकात राम मंदिर आंदोलनाने संपूर्ण देशात जोर पकडला होता. त्यावेळी दोन महिला नेत्यांची खूप चर्चा होती. लालकृष्ण अडवाणींसोबत त्या सुद्धा आघाडीवर राहून राम मंदिर आंदोलनाचे नेतृत्व करत होत्या. त्यांच्या शब्दांनी हजारो, लाखो रामभक्तांमध्ये चेतना निर्माण केली. त्यांच्या भाषणांनी कारसेवकांमध्ये जोश संचारायचा. भाजप नेत्या उमा भारती आणि साध्वी ऋतंभरा या दोन महिला नेत्या या राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्ताने एकत्र आल्या. त्यावेळी त्याही खूप भावुक झाल्या होत्या. दोघींनी एकमेकींना मिठी मारली. त्यावेळी त्यांच्या डोळ्यात पाणी होतं. कारण रामजन्मभूमी आंदोलनातील ते सगळे क्षण त्यांच्या डोळ्यासमोरून तरळून गेले असतील. इतक्या मोठ्या संघर्षानंतर आज हे भव्य मंदिर उभं राहिलंय. त्यामुळे दोघी भावनिक होणं स्वाभाविक आहे.

logo
marathi.freepressjournal.in