विरोधकांच्या इंडिया आघाडीविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका ; न्यायालयाचा सुनावणीस नकार

सर्वोच्च न्यायालयालाय या याचिकेलवर सुनावणी करण्यास नकार देत या प्रकरणी निवडणूक आयोगाकडे जाण्याचा सल्ला दिला आहे.
विरोधकांच्या इंडिया आघाडीविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका ; न्यायालयाचा सुनावणीस नकार

केंद्रातील मोदी सरकारच्या विरोधात देशातल्या २६ विरोधी पक्षांनी एकत्र येत राष्ट्रीय लोकशाही आघाडी(NDA)आव्हाण देण्यासाठी आघाडी स्थापन केली होती. या आघाडीला विरोधकांनी 'इंडिया' असं नाव दिलं होतं. विरोधकांच्या 'इंडिया' आघाडीच्या नावाविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. सर्वोच्च न्यायालयालाय या याचिकेलवर सुनावणी करण्यास नकार दिला आहे. या प्रकरणी निवडणूक आयोगाकडे जाण्याचा सल्ला सुप्रीम कोर्टाकडून देण्यात आला आहे.

याचिकाकर्त्यांच्या वतीने राजकीय नीतीमत्तेवर प्रश्न उपस्थित करताना न्यायालयाने सांगितलं की, "आम्ही इथे राजकीय पक्षांच्या नितिमत्तेवर सुनावणी करत नाही." विरोधकांच्या आघाडीच्या नावाविरोधात दिल्ली उच्च न्यायालयात एक याचिका प्रलंबीत असल्याचं याचिका कर्त्यांने सांगितलं. यावर न्यायालयाने याचिकर्त्याला सर्वोच्च न्यायालयातून याचिका मागे घेण्याची परवानगी दिली. विरोधकांनी त्यांच्या आघाडीला इंडिया असं नाव दिल्याने कायद्यातील तरतुदींचा भंग झाल्याचा आरोप करत एक याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर सुप्रीम कोर्टाने सुनावणी करण्यास नकार दिला आहे. याप्रकरणी निवडणूक आयोगाकडे जाण्याचा सल्ला सुप्रीम कोर्टाने दिला आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in