समलिंगी विवाहाबाबतच्या निर्णयाचा फेरविचार करण्यासाठी याचिका; सुप्रीम कोर्ट १० जुलैला विचार करणार

सर्वोच्च न्यायालयाने गेल्यावर्षी समलिंगी विवाहाला कायदेशीर मान्यता देण्यास नकार दिला होता.
समलिंगी विवाहाबाबतच्या निर्णयाचा फेरविचार करण्यासाठी याचिका; सुप्रीम कोर्ट १० जुलैला विचार करणार
Published on

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने गेल्यावर्षी समलिंगी विवाहाला कायदेशीर मान्यता देण्यास नकार दिला होता. त्या निर्णयाचा फेरविचार करावा, अशी मागणी करणाऱ्या अनेक याचिका करण्यात आल्या असून त्यावर सर्वोच्च न्यायालय १० जुलै रोजी विचार करणार आहे.

सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील पाच न्यायाधीशांचे पीठ १७ ऑक्टोबर २०२३ रोजी दिलेल्या निकालावर ‘इन-चेंबर’ विचार करणार आहे. फेरविचार याचिकांवर पाच न्यायाधीशांचे ‘पीठ इन-चेंबर’ विचार करते, असा प्रघात आहे. न्या. संजीव खन्ना, न्या. हिमा कोहली, न्या. बी. व्ही. नागरत्न आणि न्या. पी. एस. नरसिंह हे पीठातील अन्य न्यायाधीश आहेत.

logo
marathi.freepressjournal.in