लोकसभा निवडणुकांआधी सर्वसामान्यांना दिलासा! आजपासून पेट्रोल, डिझेल झाले स्वस्त; जाणून घ्या नवीन दर

लोकसभा निवडणुकांची कधीही घोषणा होऊ शकते, त्याआधी देशात पेट्रोल आणि डिझेल स्वस्त झाले आहे.
लोकसभा निवडणुकांआधी सर्वसामान्यांना दिलासा! आजपासून पेट्रोल, डिझेल झाले स्वस्त; जाणून घ्या नवीन दर
ANI
Published on

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकांची कधीही घोषणा होऊ शकते, त्याआधी देशात पेट्रोल आणि डिझेलच्या प्रति लिटर दरांत शुक्रवार अर्थात आजपासून दोन रुपयांची घट झाली आहे. गुरुवारी सरकारतर्फे पेट्रोल-डिझेलचे दर कमी होणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. सरकारी तेल कंपन्यांनी इंधनाचे दर दोन वर्षे कायम ठेवण्याची मुदत संपत असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.

इंधनांची सुधारित किंमत शुक्रवार, १५ मार्च रोजी सकाळी ६ वाजल्यापासून लागू होईल, असे तेल मंत्रालयाने गुरुवारी संध्याकाळी सांगितले होते. त्यानुसार आता नवी दिल्लीत पेट्रोलची किंमत प्रति लिटर ९४.७२ रुपये आणि डिझेलची किंमत प्रति लिटर ८७.६२ रुपये झाली आहे. तर, मुंबईत पेट्रोलचे नवीन दर १०४.१५ रुपये प्रतिलिटर आणि डिझेलचे दर ९२.१० रुपये प्रतिलिटर झाले आहेत.

  • पुणे : पेट्रोल १०३.८४ रुपये प्रति लिटर आणि डिझेल ९०.७१ रुपये प्रति लिटर

  • नाशिक : पेट्रोल १०४.१८ रुपये प्रति लिटर आणि डिझेल ९०.४१ रुपये प्रति लिटर

  • नागपूर : पेट्रोल १०४.०४ रुपये आणि डिझेल ९०.६३ रुपये प्रति लिटर

  • छत्रपती संभाजीनगर : पेट्रोल १०५.२१ रुपये आणि डिझेल ९१.५७ रुपये प्रति लिटर

  • अहमदनगर : पेट्रोल १०३.९६ रुपये प्रति लिटर आणि डिझेल ९१.४१ रुपये प्रति लिटर

  • ठाणे : पेट्रोल १०४.४९ रुपये प्रति लिटर आणि डिझेल ९२.४५ रुपये प्रति लिटर

  • नंदूरबार- पेट्रोल १०५.२२ रुपये प्रति लिटर आणि डिझेल ९१.७१ रुपये प्रति लिटर

logo
marathi.freepressjournal.in