दरवाढीचा तिसरा दणका; पेट्रोल, डिझेल, CNG पुन्हा महाग, दहा दिवसांत तब्बल ५ रुपयांनी महागले

जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतींचा बोजा सरकारी तेल कंपन्यांनी ग्राहकांवर टाकण्यास सुरुवात केली आहे.
दरवाढीचा तिसरा दणका; पेट्रोल, डिझेल, CNG पुन्हा महाग, दहा दिवसांत तब्बल ५ रुपयांनी महागले
दरवाढीचा तिसरा दणका; पेट्रोल, डिझेल, CNG पुन्हा महाग, दहा दिवसांत तब्बल ५ रुपयांनी महागलेसंग्रहित छायाचित्र
Published on

नवी दिल्ली: जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतींचा बोजा सरकारी तेल कंपन्यांनी ग्राहकांवर टाकण्यास सुरुवात केली आहे. शनिवारी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर ८७ ते ९१ पैशांची वाढ करण्यात आली. यामुळे गेल्या १० दिवसांपेक्षा कमी कालावधीत इंधनाच्या दरात एकूण ५ रुपयांची वाढ झाली आहे.

दरवाढीचा तिसरा दणका; पेट्रोल, डिझेल, CNG पुन्हा महाग, दहा दिवसांत तब्बल ५ रुपयांनी महागले
पेट्रोल, डिझेलच्या दरात प्रति लिटर ९० पैशांची वाढ; पाच दिवसांतील दुसरी दरवाढ

यासोबतच, सीएनजीच्या दरातही प्रति किलो १ रुपयाची वाढ करण्यात आली असून, गेल्या काही दिवसांतील ही तिसरी वाढ आहे. दिल्लीत सीएनजीचा दर आता ८१.०९ रुपये प्रति किलो झाला आहे. यामुळे सीएनजी एकूण ४ रुपयांनी महागला आहे. या ताज्या दरवाढीमुळे देशातील सर्वसामान्य नागरिकांचे कंबरडे मोडले आहे. वाहतूक खर्च वाढल्याने महागाई आणखी भडकण्याची भीती व्यक्त केली जात आहे. सरकारी तेल कंपन्यांनी १५ मे रोजी दरवाढीचा निर्णय घेण्यापूर्वीच, नायरा एनर्जी आणि शेलसारख्या खासगी कंपन्यांनी आपले दर वाढवले होते. मात्र, शनिवारी सरकारी कंपन्यांनी केलेल्या दरवाढीनंतर नायरा एनर्जीनही आपले दर त्याच प्रमाणात वाढवले आहेत. रिलायन्स आणि बीपीची भागीदारी असलेल्या 'जिओ-बीपी'नेही सरकारी कंपन्यांच्या बरोबरीने दरात वाढ केली आहे.

पेट्रोलियम मंत्रालयाच्या संयुक्त सचिव सुजाता शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, १५ मे च्या दरवाढीमुळे कंपन्यांचा तोटा २५ टक्क्यांनी कमी झाला असला, तरी सरकारी तेल कंपन्यांना अजूनही दररोज सुमारे ७५० कोटी रुपयांचा तोटा होत आहे. 'क्रिसिल' या संस्थेच्या अहवालानुसार, या दरवाढीनंतरही कंपन्यांना पेट्रोलवर प्रति लीटर १० रुपये आणि डिझेलवर प्रति लीटर १३ रुपयांचा तोटा होत आहे.

प्रमुख शहरांमधील नवे दर

शहर पेट्रोल डिझेल

मुंबई १०८.४९ ९५.०२

दिल्ली ९९.५१ ९२.४९

कोलकाता ११०.६४ ९७.०२

चेन्नई १०५.३१ ९६.९८

logo
marathi.freepressjournal.in