४० हजार कोटींची गुंतवणूक पेट्रोनेट करणार;
निव्वळ नफा तिप्पट वाढवण्यासाठी योजना

४० हजार कोटींची गुंतवणूक पेट्रोनेट करणार; निव्वळ नफा तिप्पट वाढवण्यासाठी योजना

ही योजना दोन वर्षांपूर्वी आखण्यात आली आणि ती २०२७-२८ पर्यंतच्या कालावधीसाठी आहे.

बेतुल (गोवा) : जगातील सर्वात मोठ्या लिक्विफाइड नॅचरल गॅस (एलएनजी) आयात टर्मिनलची ऑपरेटर असलेल्या पेट्रोनेट एलएनजी लिमिटेड आयात क्षमता वाढवण्यासाठी ४० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. पेट्रोकेमिकल्सने २०२८ पर्यंत निव्वळ नफा तिप्पट करण्याचे लक्ष्य ठेवले आहे, असे कंपनीचे सीईओ ए. के. सिंग यांनी सांगितले.

पेट्रोनेट प्रोपेन डिहायड्रोजनेशन प्लांटमध्ये १२,६८५ कोटी रुपयांची गुंतवणूक करून पेट्रोकेमिकल व्यवसायात प्रवेश करत आहे. त्यामुळे आयातीत फीडस्टॉक प्रोपलीनमध्ये रूपांतरित होईल, तसेच ओदिशातील गोपालपूर येथे २,३०० कोटी रुपये खर्चून एलएनजी आयात सुविधा उभारली जाईल, असे त्यांनी सांगितले. इंडिया एनर्जी वीकच्या निमित्ताने येथे त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

कंपनीने या आठवड्यात कतारमधून दरवर्षी ७.५ दशलक्ष टन एलएनजी आयात करण्याचा करार २० वर्षांनी वाढविला असून कंपनी श्रीलंकेतील कोलंबो येथे फ्लोटिंग एलएनजी टर्मिनल सारख्या परदेशी प्रकल्पांमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत आहे. आम्ही १-५-१०-४० धोरण आखले आहे. विस्तारामध्ये ४० हजार कोटी गुंतवण्यापासून १० हजार कोटींच्या निव्वळ नफ्यासह ५ वर्षांत उलाढाल रु. १ लाख कोटींपर्यंत वाढवायची आहे, असे ते म्हणाले. ही योजना दोन वर्षांपूर्वी आखण्यात आली आणि ती २०२७-२८ पर्यंतच्या कालावधीसाठी आहे. पेट्रोनेटची सध्या ५५ हजार ते ६० हजार कोटी रुपयांची उलाढाल आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in