चीनचा हेर समजून अटक झालेले कबुतर निर्दोष, आठ महिन्यांच्या अटकेनंतर मुक्तता

चीनचा हेर समजून पकडण्यात आलेल्या कबुतराची अखेर आठ महिन्यांच्या अटकेनंतर बुधवारी निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.
चीनचा हेर समजून अटक झालेले कबुतर निर्दोष, आठ महिन्यांच्या अटकेनंतर मुक्तता
Published on

मुंबई : चीनचा हेर समजून पकडण्यात आलेल्या कबुतराची अखेर आठ महिन्यांच्या अटकेनंतर बुधवारी निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.

गेल्या मे महिन्यामध्ये चेंबूर उपनगरातील पीर पौ जेट्टीमध्ये एक कबुतर पकडण्यात आले होते. त्याच्या एका पायात तांब्याचे तर दुसऱ्या पायात अॅल्युमिनिअमचे वळे होते. तसेच कबुतराच्या पंखाच्या आतल्या बाजूस चिनी अक्षरात काही संदेश लिहिण्यात आले होते. आरसीएफ पोलिसांनी या कबुतराला ताब्यात घेतले. संदेश पाहून हे कबुतर चिनी हेर असल्याचा संशय पोलिसांना आला. त्यांनी ते कबुतर परेल येथील बार्इ सकराबार्इ दिनशॉ पेटीट हॉस्पीटल या पशुप्राण्यांच्या रुग्णालयात कोठडीत ठेवले. आरसीएफ पोलिसांनी याबाबत खटला दाखल करुन तपास केला. तेव्हा हे कबुतर तैवानमधील असल्याचे आढळले. तैवानमध्ये हे कबुतर शर्यतीसाठी वापरले जात होते. ते भरकटून भारतात आले होते. याची खात्री पटल्यानंतर पोलिसांनी कबुतराला सोडून देण्याची सूचना केली. त्यानुसार बुधवारी या कबुतराची निर्देाष मुक्तता करण्यात आली. कबुतर सोडतांना त्यांची तब्येत उत्तम असल्याची खात्री करुन घेण्यात आली.

logo
marathi.freepressjournal.in