लष्कराचे चिता हेलिकॉप्टर कोसळून वैमानिकाचा मृत्यू

बुधवारी दुपारी झालेल्या या अपघातात कर्नल सौरभ यादव हे गंभीर जखमी झाले होते.
लष्कराचे चिता हेलिकॉप्टर कोसळून वैमानिकाचा मृत्यू
Published on

अरुणाचल प्रदेशातील तवांग भागात भारतीय हवाई दलाचे ‘चिता’ हेलिकॉप्टर बुधवारी कोसळून झालेल्या अपघातामध्ये वैमानिकाचा मृत्यू झाला आहे. लष्करी अधिकाऱ्यांनी या दुर्घटनेची माहिती दिली.

बुधवारी दुपारी झालेल्या या अपघातात कर्नल सौरभ यादव हे गंभीर जखमी झाले होते. त्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, पण उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. ‘चिता’ हेलिकॉप्टरला न्यामजंग चू या भागात अपघात झाला. पाचव्या इन्फ्रेंट्री डिव्हिजन ऑफिसर कमांडिग यांना सोडून हे हेलिकॉप्टर हे सुरवा चांबातून परतत असताना हा अपघात झाला. दरम्यान, हेलिकॉप्टरच्या अपघाताचे नेमके कारण अद्याप कळू शकलेले नाही. लष्कराने या अपघाताच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.

logo
marathi.freepressjournal.in