पीयूष गोयल यांनी घेतला सरकारी ई मार्केटप्लेसच्या प्रगतीचा आढावा

जीईएमचे परिचालन तसेच निर्धारित वेळेत खरेदी आणि सेवा वितरण या बाबींचा विस्तृत आढावा घेण्यात आला
पीयूष गोयल यांनी घेतला सरकारी ई मार्केटप्लेसच्या प्रगतीचा आढावा

केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग, ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण आणि वस्त्रोद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी सरकारी ई मार्केटप्लेसच्या (जीईएम) प्रगतीचा आढावा घेतला.

इतर अनेक गोष्टींबरोबरच, जीईएमचे परिचालन तसेच निर्धारित वेळेत खरेदी आणि सेवा वितरण या बाबींचा विस्तृत आढावा घेण्यात आला. एप्रिल २२ पासून जीईएमच्या माध्यमातून ऑनलाइन पूर्तता आणि पेमेंट झालेल्या सर्व ऑर्डर्सपैकी ९५ टक्क्यांहून अधिक ऑर्डर्स वेळेत पूर्ण झाल्या आहेत असे आढळून आले आहे. गोयल यांनी जीईएमवर ग्राहकांकडून केल्या जाणाऱ्या सर्व व्यवहारांसाठी संपूर्ण प्रक्रिया आणि भरणा ऑनलाइन करण्याची तसेच निहित वेळेत सेवा पुरवण्याबाबत सूचना केली.

सूक्ष्म आणि लघु उद्योगांना प्रोत्साहन देऊन खर्चात बचत आणि सामाजिक समावेशकता आणण्यासाठी सर्व सरकारी खरेदी पूर्णपणे ऑनलाइन आणि पारदर्शक अशा जीईएम पोर्टलद्वारे करण्याच्या गरजेवर त्यांनी भर दिला. संभाव्य संगनमत आणि फसवणूक होत असल्यास त्याचा शोध घेण्यासाठी एआय-एमएलचा वापर करण्याबरोबरच खरेदी व्यवहारांतील अनियमितता रोखण्यासाठी कठोर देखरेख आदी उपाययोजनांचा आढावा घेण्यात आला.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in