काँग्रेसच्या काळातील सार्वजनिक कंपन्या विकण्यात पंतप्रधान व्यस्त - जयराम रमेश

पूर्वी काँग्रेस सरकारांनी तयार केलेल्या रुरकेला पोलाद प्रकल्पासह (आरएसपी) सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम धोक्यात आहेत.
काँग्रेसच्या काळातील सार्वजनिक  कंपन्या विकण्यात पंतप्रधान व्यस्त - जयराम रमेश
PM

रुरकेला : पूर्वी काँग्रेस सरकारांनी तयार केलेल्या रुरकेला पोलाद प्रकल्पासह (आरएसपी) सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम धोक्यात आहेत. त्याचे कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी हे प्रकल्पांना विकण्यात व्यस्त आहेत, असा दावा काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी बुधवारी केला.

ओदिशातील सुंदरगड जिल्ह्यातील राजगंगपूर येथे पोहोचलेल्या भारत जोडो न्याय यात्रेमध्ये पक्षाचे नेते राहुल गांधी यांच्यासोबत असलेले रमेश यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. ते म्हणाले की, पंडित नेहरूंनी देशात अनेक सार्वजनिक क्षेत्रे निर्माण केली, पण ती सर्व आज धोक्यात आहेत. काँग्रेसने तयार केलेले हे सार्वजनिक उपक्रम पंतप्रधान मोदी त्यांच्या मित्रांना विकण्यात व्यस्त आहेत, पण काँग्रेस पक्ष याला विरोध करील.

आपल्या देशाच्या आर्थिक इतिहासात रुरकेलाला विशेष महत्त्व आहे, असे सांगून रमेश म्हणाले की, काँग्रेस सरकारने ओदिशात आरएसपी, नाल्को, एनटीपीसी आणि इतर असे मोठे प्रकल्प उभारले आहेत आणि ते सर्व भाजपच्या कारभारामुळे सुरक्षित नाहीत. काँग्रेसने तयार केलेल्या रेल्वे, सेल, पोर्ट, विमानतळ आणि इतरांसह देशातील मोठे सार्वजनिक उपक्रम मोदींच्या 'मित्र नीती'मुळे आज विकले जात आहेत. जीएसटीमध्ये सुधारणा करून छोट्या उद्योगांसाठी नवीन आर्थिक मॉडेल तयार करणे हे आमचे प्राधान्य आहे. आंधळे खाजगीकरण थांबवणे, पीएसयू पुनरुज्जीवित करणे आणि रिक्त सरकारी पदे भरणे ही काँग्रेसची दृष्टी ओडिशासह संपूर्ण देशात रोजगार निर्माण करू शकते असे, रमेश म्हणाले.

त्यांनी आरोप केला की ओदिशातील ३० लाखांहून अधिक लोक नोकऱ्यांच्या शोधात इतर राज्यांमध्ये स्थलांतरित झाले आहेत तर ३० अब्जाधीश उद्योगपती मोदी-नवीन पटनायक मैत्रीच्या आश्रयाखाली राज्याबाहेरून आले आहेत.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in