PM Modi birthday : सत्तर वर्षांनंतर चित्ते भारतीय भूमीत परतले

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या ७२ व्या वाढदिवसानिमित्त या चित्त्यांना कुनो अभयारण्यात सोडले. नामिबियातून आठ चित्ते आज भारतात आणण्यात आले आहेत.
PM Modi birthday : सत्तर वर्षांनंतर चित्ते भारतीय भूमीत परतले

तब्बल सात दशकांनंतर म्हणजे सत्तर वर्षांनंतर चित्ते भारतीय भूमीत परतले आहेत. नामिबियातून आणलेल्या आठ चित्त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते कुनो अबरानमध्ये सोडण्यात आले. आठ चित्तांमध्ये 4 माद्या आणि 3 नर आहेत. आठ चित्त्यांना घेऊन एक विशेष विमान नामिबियाहून ग्वाल्हेर विमानतळावर दाखल झाले. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या ७२ व्या वाढदिवसानिमित्त या चित्त्यांना कुनो अभयारण्यात सोडले. नामिबियातून आठ चित्ते आज भारतात आणण्यात आले आहेत.

चित्त्यांना एक महिना क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात येणार आहे. कुनो नॅशनल पार्क हे 748 चौरस किलोमीटरमध्ये पसरलेले संरक्षित क्षेत्र आहे. या उद्यानात चित्तांसाठी 12 किमी लांबीचे कुंपण बांधण्यात आले आहे. या अधिवासात सुरुवातीला चित्ते ठेवण्यात येणार आहेत. भारतात आणलेल्या चित्त्यांना काही आव्हानांचा सामना करावा लागणार आहे. चित्त्यांना भारतातील वातावरणाशी जुळवून घ्यावे लागते. चित्त्यांना 24 तास पाळत ठेवण्यात येणार आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in