भ्रष्टाचाऱ्यांना वाचवणाऱ्यांना सुप्रीम कोर्टाचा झटका; पंतप्रधान नरेंद्र मोदींची विरोधकांवर टीका

पंतप्रधानांनी सिकंदराबाद-तिरुपती वंदे भारत एक्स्प्रेसला हिरवा झेंडा दाखवला, ११,३०० कोटींच्या योजनांचे लोकार्पण व भूमिपूजन
भ्रष्टाचाऱ्यांना वाचवणाऱ्यांना सुप्रीम कोर्टाचा झटका; पंतप्रधान नरेंद्र मोदींची विरोधकांवर टीका
@ANI

केंद्र सरकार भ्रष्टाचाऱ्यांविरोधात कारवाई करत आहे. या भ्रष्टाचाऱ्यांना वाचवण्यासाठी विरोधक सुप्रीम कोर्टात गेले होते. पण, सुप्रीम कोर्टानेच त्यांना झटका दिला, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी केली. पंतप्रधानांनी सिकंदराबाद-तिरुपती वंदे भारत एक्स्प्रेसला हिरवा झेंडा दाखवला. तसेच ११,३०० कोटींच्या योजनांचे लोकार्पण व भूमिपूजन त्यांनी केले. पंतप्रधान म्हणाले की, राजकारणात घराणेशाही जपणारे प्रत्येक बाबींवर नियंत्रण ठेवू इच्छितात. पण, मोदी यांनी भ्रष्टाचारावर कारवाई सुरू केली. त्यामुळे हे घराणेशाही जपणारे राजकीय पक्ष संतापले आहेत. काही जण भ्रष्टाचाराविरोधात कायदेशीर कारवाईविरोधात सुप्रीम कोर्टात गेले होते. मात्र, कोर्टाने त्यांना झटका दिला. त्यामुळे त्यांना हात हलवत परतावे लागले, असे ते म्हणाले.

तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्यावर टीका करताना ते म्हणाले की, केंद्राच्या अनेक प्रकल्पांना राज्याचे सहकार्य मिळत नसल्याने त्याला विलंब होत आहे. त्यामुळे तेलंगणाच्या जनतेचे नुकसान होत आहे. विकासाशी संबंधित कोणत्याही कामात बाधा आणू नये, असे आवाहन त्यांनी केले. तेलंगणाला ‘एम्स’ देण्याचे सौभाग्य आमच्या सरकारला मिळाले आहे. केंद्र सरकारच्या अनेक प्रयत्नांनंतरही देशातील काही लोकांना देशहित व समाजहिताशी काहीही देणेघेणे नाही. त्यांना केवळ आपली घराणेशाही जोपासायची आहे. तेलंगणातील जनतेने यापासून सतर्क राहणे गरजेचे आहे, असे ते म्हणाले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in