हिंमत असल्यास अनुच्छेद ३७० रद्द करून दाखवावे; मोदींचे काँग्रेससह अन्य विरोधी पक्षांना आव्हान

दहशतवाद, हल्ले, दगडफेक आणि सीमेपलीकडून होणारा गोळीबार या घटनांपासून मुक्त वातावरणात यावेळी जम्मू-काश्मीरमध्ये लोकसभेच्या निवडणुका होत आहेत,...
हिंमत असल्यास अनुच्छेद ३७० रद्द करून दाखवावे; मोदींचे काँग्रेससह अन्य विरोधी पक्षांना आव्हान

उधमपूर (जम्मू-काश्मीर) : दहशतवाद, हल्ले, दगडफेक आणि सीमेपलीकडून होणारा गोळीबार या घटनांपासून मुक्त वातावरणात यावेळी जम्मू-काश्मीरमध्ये लोकसभेच्या निवडणुका होत आहेत, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी येथे सांगितले आणि गेल्या तीन दशकांपासून फुटीर गटांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकण्यासाठी सुरू ठेवलेला प्रचार आता इतिहासजमा झाल्याचे संकेत दिले.

भाजपच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने ऑगस्ट २०१९ मध्ये रद्द केलेले अनुच्छेद ३७० हिंमत असल्यास पुन्हा लागू करावे, असे आव्हान मोदी यांनी काँग्रेस आणि अन्य विरोधी पक्षांना उधमपूर येथे एका निवडणूक प्रचारसभेतून दिले. जम्मू-काश्मीरमधील जनतेच्या हालअपेष्टा दूर करण्याच्या दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करण्यात आल्याचेही पंतप्रधान म्हणाले.

केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह हे उधमपूर मतदारसंघातून सलग तिसऱ्यांदा निवडणूक रिंगणात असून काँग्रेसने येथे चौधरी लाल सिंह यांना तर डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह आजाद पार्टीने जी. एम. सरुरी यांना उमेदवारी दिली आहे. माता वैष्णोदेवी मंदिरात प्रार्थना केल्यावर आपण २०१४ मध्ये याच मैदानावरून जनतेला संबोधित केले होते, दहशतवादाच्या झळांमधून मुक्त करण्याचे आश्वासन तेव्हा आपण जनतेला दिले होते आणि जनतेच्या आशीर्वादाने आज आपण ही गॅरेंटी पूर्ण केली आहे, असे मोदी म्हणाले.

दहशतवाद, फुटीरतावाद, दगडफेक, हल्ले आणि सीमेपलीकडून होणारा गोळीबार यापासून मुक्त वातावरणात अनेक दशकांनंतर येथे निवडणूक होत आहे, असेही पंतप्रधान म्हणाले. अनुच्छेद ३७० रद्द केल्यानंतर प्रदेशात आगडोंब उसळेल आणि जम्मू-काश्मीर देशापासून विभक्त होईल, असे काही राजकीय पक्षांना वाटत होते. विरोधी पक्षांना विशेषत: काँग्रेसला आव्हान देतो की हिंमत असेल तर अनुच्छेद ३७० पुन्हा जारी करून दाखवा, असे मोदी म्हणाले.

logo
marathi.freepressjournal.in