मोदींनी भाजपला 'पार्टी फंड'साठी दिली 'इतकी' रक्कम, देणगीची पावतीही केली शेअर

भाजपच्या देणगी गोळा करण्याच्या मोहिमेची सुरुवात १ मार्चला पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी केली होती. त्यावेळेस स्वतः नड्डा यांनी पक्षाला एक हजार रुपयांचे योगदान दिले होते.
मोदींनी भाजपला 'पार्टी फंड'साठी दिली 'इतकी' रक्कम,  देणगीची पावतीही केली शेअर

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपला ‘पार्टी फंड’ म्हणून २००० रुपयांची देणगी दिली, तसेच प्रत्येकाने योगदान द्यावे, असे आवाहनही त्यांनी केले. ‘एक्स’वर मोदींनी नागरिकांना नमो ॲपद्वारे ‘राष्ट्र उभारणीसाठी देणगी’ देत या मोहिमेचा भाग होण्याचे आवाहन केले.

त्यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले की, ‘हे योगदान देताना आणि विकसित भारत तयार करण्याच्या आमच्या प्रयत्नांना बळ देताना मला आनंद होत आहे’. मोदींनी पक्षाला दिलेल्या देणगीच्या पावतीसह ही पोस्ट केली आहे. भाजपच्या देणगी गोळा करण्याच्या मोहिमेची सुरुवात १ मार्चला पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी केली होती. त्यावेळेस स्वतः नड्डा यांनी पक्षाला एक हजार रुपयांचे योगदान दिले होते.

logo
marathi.freepressjournal.in