आसाममध्ये हायवेवर 'लँडिंग'; मोदींनी स्वतःचे विमान उतरवून चीनला दिला संदेश

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी आसाममधील रणनीतीच्या दृष्टिकोनातून महत्त्वाच्या असलेल्या 'मोरान बायपास इमर्जन्सी लँडिंग फॅसिलिटी' वर आपले 'आयएएफ सी-१३०' हे सुपर हर्म्युलस विमान लँड करून चीनला एक संदेश दिला आहे.
आसाममध्ये हायवेवर 'लँडिंग'; मोदींनी स्वतःचे विमान उतरवून चीनला दिला संदेश
Published on

गुवाहाटी: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी आसाममधील रणनीतीच्या दृष्टिकोनातून महत्त्वाच्या असलेल्या 'मोरान बायपास इमर्जन्सी लँडिंग फॅसिलिटी' वर आपले 'आयएएफ सी-१३०' हे सुपर हर्म्युलस विमान लँड करून चीनला एक संदेश दिला आहे.

पंतप्रधान प्रथम चाबुआ एअरफील्डवर पोहोचले. त्यानंतर ते हवाई दलाच्या सी-१३० विमानाने दिब्रुगडला गेले. विमान मोरान बायपासवरील आपत्कालीन लँडिंग सुविधा येथे उतरले आणि असे करणारे ते पहिले पंतप्रधान बनले.

आसामच्या दिब्रुगड बायपासवरील आपत्कालीन लैंडिंग फॅसिलिटी (ईएलएफ) ही भारताच्या रणनीती इन्फ्रास्ट्रक्चरचा महत्त्वाचा भाग आहे. राष्ट्रीय महामार्ग १२७ वरील हा ४.२ किमीचा भाग मोदी यांच्या लँडिंगच्यावेळी वापरण्यात आला. त्याचबरोबर राफेल आणि सुखोई ३० एमकेआय फायटर जेट यांनीही या हायवेवर आपली कर्तबगारी दाखविली.

लोकेशन महत्त्वाचे

चीनसोबतच्या अवघ्या ३०० किमीवर आहे, आसाममधील 'ईएलएफ' एलओसीपासून रणनीतीदृष्ट्या याचे लोकेशन अत्यंत महत्त्वाचे आहे. जवळच्या चाबुआ आणि तेजपूर एअरबेसला एक बँक-अप पर्याय म्हणून त्याचा वापर करता येऊ शकतो. संघर्षाच्या काळात शत्रूकडून आपले मुख्य हवाई तळ लक्ष्य केले जाऊ शकतात त्यावेळी 'ईएलएफ' सुविधा हवाई दलास पर्याय उपलब्ध करून देते. स्टॅटिक एअरबेसपेक्षा हे ग्रीड शत्रूना न्यूट्रलाईज करण्यास अत्यंत कठीण जाते.

या फॅसिलिटीमुळे दुर्गम भागाशी कनेक्ट करणे सोपे जाते, या फॅसिलिटीवर अवजड वाहतूक विमाने उतरू शकतात, त्यामुळे आसामच्या वरील भागांमध्ये जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणे, बचाव पथके आणि वैद्यकीय मदत पोहोचविणे शक्य होते. 'मोरान फॅसिलिटी' ही 'बॉर्डर नॅशनल सिक्युरिटी इनिशिएटिव्ह' चा भाग आहे.

योजनांची सुरुवात

मोदी यांनी शनिवारी मोरान येथे इमर्जन्सी लँडिंग फँसेलिटीचे (ईएलएफ) उद्धघाटन केले. यासह त्यांनी या भागातील ५,५०० कोटींच्या विविध योजनांची सुरुवात केली. चाबुआ हवाई क्षेत्रात आसामचे राज्यपाल लक्ष्मण प्रसाद आचार्य, मुख्यमंत्री हिमंत विश्व शर्मा यांनी मोदींचे स्वागत केले. मोदींचे विमान सी-१३० हे महामार्गावर तयार करण्यात आलेल्या धावपट्टीवर उतरवण्यात आले. हे विमान पहिल्यांदा महामार्गावर उतरवले गेले. तर येथे जवळपास ४० मिनिटांचा वायुदलाने 'एअर शो'पण केला. यावेळी वायुदलाच्या लढाऊ विमानांनी आकाशात 'चार चाँद' लावले.

ईएलएफ

पंतप्रधान अगोदर चाबुआ येथे पोहचले. तेथे सी-१३० मध्ये बसून ते मोरानला पोहोचले. मोरान एअरस्ट्रिप एनएच-१२७ च्या ४.४ किमी लांब तयार करण्यात आलेल्या धावपट्टीवर 'ईएलएफ' तयार करण्यात आली आहे. ही भारताची पहिली 'इमर्जन्सी लँडिंग फॅसिलिटी' आहे. यामुळे लष्करी आणि नागरिकांसाठीच्या विमानांना उतरता येईल.

सुखाई-३० उतरले धावपट्टीवर

या कार्यक्रमात सर्वात अगोदर एक राफेल आणि एक सुखोई-३० धावपट्टीवर उतरवण्यात आले. यानंतर वायुदलाने डॉर्नियर विमानाने या धावपट्टीवरून उड्डाण केले. त्यानंतर सी-१३०जे चे लैंडिंग केले. तर त्यानंतर सुखोई आणि राफेल यांनी एकानंतर एक असे उड्डाण केले. तीन सुखोई लढाऊ विमाने मंचासमोरून झेपावले. त्यांनी 'टच अँड गो ड्रिल' करून दाखवली. त्यानंतर तीन राफेल विमानांनीसुद्धा फार्मेशन ड्रिल केली.

'ईएलएफ' सुविधेचा फायदा

भविष्यात टू फ्रंट वॉरचे आव्हान असताना भारतीय वायुदल त्यासाठी जोरदार तयारी करत आहे. देशातील विविध भागात हायवेवर, महामार्गावर विमानांच्या आपत्कालीन लँडिंगसाठी तयारी करण्यात आली आहे. त्यामुळे लढाऊ आणि वाहतूक विमानांना येथे उतरता येईल. हा रनवे त्यांच्यासाठी फायद्याचा ठरेल. ही योजना केंद्र सरकार, रस्ते वाहतूक मंत्रालय आणि भारतीय वायुदलाच्या संयुक्त उपक्रमातून तयार करण्यात आली आहे. या नवीन दमदार पावलामुळे भारताच्या पूर्वोत्तर राज्याशी संपर्क वाढणार आहे. तर चीन आणि बांगलादेशला हा मोठा शह मानला जात आहे.

पर्यायी 'रन वे'

'ईएलएफ' हा पर्यायी 'रन वे' असतो, ही थेट हायवेवर तयार करण्यात आलेली एक व्यवस्था असते. ती उच्च पातळीची उष्णता आणि मोठ्या विमानांचे वजन पेलण्यास सक्षम असते. या हायवेवर ४० टनाचे फायटरजेट्स हेवी कॉम्बॅट एअरक्राफट उतरू शकतात, लष्करी सामानाची ने-आण करणारे ७४ टन वजनाचे ट्रान्स्पोर्ट एअरक्रफ्टही येथे उतरू शकतात आणि वेगाने डिप्लॉयमेण्टसाठी वापरण्यात येणारे हेलिकॉप्टर्सही याचा वापर करू शकतात.

logo
marathi.freepressjournal.in