मोदी जुलै महिन्यात रशियाच्या दौऱ्यावर?

रशिया-युक्रेन संघर्ष सुरू झाल्यापासून हा मोदींचा पहिलाच रशिया दौरा असेल.
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जुलै महिन्याच्या पूर्वार्धात रशियाच्या दौऱ्यावर जाण्याची शक्यता असल्याने त्या दृष्टिकोनातून भारत आणि रशियाचे अधिकारी चाचपणी करीत आहेत, असे मंगळवारी राजनैतिक सूत्रांनी सांगितले.

मोदी यांच्या दौऱ्याचा कार्यक्रम ठरला तर पाच वर्षांनंतरची मोदींची ही पहिली रशिया भेट ठरणार आहे. तसेच, रशिया-युक्रेन संघर्ष सुरू झाल्यापासून हा मोदींचा पहिलाच रशिया दौरा असेल. यापूर्वी सप्टेंबर २०१९ मध्ये मोदी रशियाच्या दौऱ्यावर गेले होते. मोदींच्या संभाव्य दौऱ्याला भारतीय अधिकाऱ्यांकडून अद्याप दुजोरा मिळालेला नाही. भारत-रशिया वार्षिक शिखर परिषदेसाठी दौऱ्याचे नियोजन करण्यात येणार आहे.

दरम्यान, मोदींच्या भेटीसाठी जोरदार तयारी सुरू करण्यात येत असल्याचे रशियातील माध्यमांनी क्रेमलिनच्या हवाल्याने म्हटले आहे. आतापर्यंत दोन्ही देशांमध्ये २१ शिखर परिषदा झाल्या आहेत. शेवटची शिखर परिषद ६ डिसेंबर २०२१ रोजी भारतात झाली होती, तेव्हा रशियाचे अधियक्ष पुतिन भारत दौऱ्यावर आले होते.

logo
marathi.freepressjournal.in