ऑस्कर मिळवणाऱ्या 'त्या' दोघांची पंतप्रधान मोदींनी घेतली भेट

काही दिवसांपूर्वीच नेटफ्लिक्सच्या 'द एलिफंट व्हिस्परर्स' या भारतीय माहितीपटाला ऑस्करने गौरविण्यात आले होते
ऑस्कर मिळवणाऱ्या 'त्या' दोघांची पंतप्रधान मोदींनी घेतली भेट
@narendramodi
Published on

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज बंदीपूर व्याघ्र प्रकल्पाला भेट दिली. यानंतर त्यांनी ऑस्कर विजेत्या ‘द एलिफंट व्हिस्परर्स' या भारतीय माहितीपटातील दाम्पत्यासह त्यांच्या 'रघु' या हत्तीच्या पिलाचीदेखील भेट घेतली. ऑस्कर विजेत्या 'द एलिफंट व्हिस्परर्स' या माहितीपटाचे चित्रीकरण तामिळनाडूच्या निलगिरी पर्वतरांगेतील मदुमलाई व्याघ्र प्रकल्पातील थेप्पाकडू हत्ती कॅम्पमध्ये झाले होते.

थेप्पाकडू हत्ती कॅम्प हा आशिया खंडातील सर्वात जुना हत्ती कॅम्प आहे. सध्या येथे २८ हत्ती असून त्यांना प्रशिक्षण आणि त्यांची काळजी घेण्यासाठी या कॅम्पमध्ये खास लोक काम करतात. याच कॅम्पमधील हत्तींची काळजी घेणारे बोमन आणि बेली या दाम्पत्याची पंतप्रधान मोदींनी आज भेट घेतली.

logo
marathi.freepressjournal.in