PM Modi : बीबीसी वादग्रस्त माहितीपटावर पंतप्रधानांनी दिली पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...

एकीकडे गुजरातच्या दंगलींवर बीबीसीचा माहितीपट देशात वादग्रस्त ठरत असताना दुसरीकडे अनेक ठिकाणी याचे अनेक विद्यापीठांमध्ये स्क्रीनिंग करण्याचे प्रयत्न होत आहेत.
PM Modi : बीबीसी वादग्रस्त माहितीपटावर पंतप्रधानांनी दिली पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...

जगात प्रसिद्ध असलेली वृत्तवाहिनी बीबीसीने नुकतेच गुजरात दंगलीवरून एक माहितीपट जगभरात प्रसिद्ध केला. ‘इंडिया: द मोदी क्वेशन’ या माहितीपटामध्ये गुजरात दंगली आणि तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदींच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. त्यामुळे या माहितीपटाला देशभरातून विरोध होत असून भारतामध्ये सर्व प्लॅटफॉर्मवरून यासंबंधित सर्व व्हिडीओ हटवला आहेत. असे असतानाही देशाच्या अनेक विद्यापीठांमध्ये हा माहितीपट विद्यार्थ्यांना दाखवण्यात येत असल्याच्या घटना समोर आल्या आहेत. यावरून पंतप्रधान मोदी प्रतिक्रिया देताना म्हणाले की, "देशातील विद्यार्थ्यांमध्ये फूट पाडण्यासाठी हे प्रयत्न केले जात आहेत." अशी टीका केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, "देशात मतभेद आणि फूट पाडण्याचा प्रयत्न केला जात आहे. पण, आपण सर्वांनी सावधगिरी बाळगली पाहिजे. फूट पाडण्याचा प्रयत्न करणाऱ्यांचे प्रयत्न यशस्वी होणार नाही," असा इशारा त्यांनी दिला आहे. ते पुढे म्हणाले की, "एकता ही भारताची ताकद आहे. देशातील लोकांमध्ये कधीही मतभेद निर्माण होऊ नये यासाठी एकता हाच एक पर्याय आहे. पण, आपल्या भारतमातेच्या मुलांमध्ये फूट पाडण्यासाठी अनेक मुद्दे उपस्थित केले जात आहेत." अशी टीका त्यांनी केली. दिल्लीतील कॅन्टोन्मेंटमधील करिअप्पा मैदानावर राष्ट्रीय छात्र सेनेच्या तरुणांशी संवाद साधताना पंतप्रधान मोदी बोलत होते.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in