PM Modi On Chandrayaan-3: इस्रो चंद्रावर पाठवणार भारतीय माणूस; पंतप्रधान मोदींनी सांगितलं आगामी टार्गेट

इस्त्रोने सांगितले आहे की, प्रोपल्शन मॉड्यूल चंद्राच्या कक्षेतून परत पृथ्वीच्या कक्षेत परत आणण्याच्या प्रयोगाचा मुख्य फायदा येणाऱ्या मोहिमांची योजना तयार करण्यासाठी होईल.
PM Modi On Chandrayaan-3: इस्रो चंद्रावर पाठवणार भारतीय माणूस; पंतप्रधान मोदींनी सांगितलं आगामी टार्गेट
Published on

इस्त्रोने 'चांद्रय़ान-३' चे प्रोपल्शन मॉड्यूल चंद्राच्या कक्षेतून पृथ्वीच्या कक्षेत यशस्वीरित्या परत आणलं आहे. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी याबद्दल सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर हा भारताच्या भविष्यातील अंतराळातील प्रयत्नांसाठी हे मोठं यश असल्याचे म्हटले आहे.

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, इस्त्रोचे अभिनंदन, आपल्या भविष्यातील अंतराळ मोहिमांबद्दल आपण एक मैलाचा दगड यशवीरित्या गाठला आहे. ज्यामध्ये २०४० पर्यंत एका भारतीय नागरिकाला चंद्रावर पाठवण्याच्या उद्देशाचा देखील समावेश आहे.

इस्त्रोने मंगळवारी या ऑपरेशनला एक अनोखा प्रयोग असं म्हटलं आहे. 'चांद्रयान-३' चा मुख्य उद्देश चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सॉफ्ट लँडिंग करणे आणि विक्रम लँडर व प्रज्ञान रोव्हरवर लावण्यात आलेल्या उपकरणांच्या मदतीने चंद्राच्या पृष्ठभागाचा सखोल अभ्यास करणे हा होता. हे अंतराळ यान १४ जुलै २०२३ ला श्रीहरीकोट्टा येथील सतीश धवन स्पेस सेंटरहून एलव्हीएम३-एम४ रॉकेटच्या मदतीने लाँच करण्यात आलं होतं. 'चांद्रयान-३' ने २३ ऑगस्टला संध्याकाळी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वीरित्या सॉफ्ट लँडिंग केलं होतं.

इस्त्रोने सांगितले आहे की, प्रोपल्शन मॉड्यूल चंद्राच्या कक्षेतून परत पृथ्वीच्या कक्षेत परत आणण्याच्या प्रयोगाचा मुख्य फायदा येणाऱ्या मोहिमांची योजना तयार करण्यासाठी होईल. खासकरून चंद्रावरून मिशन पृथ्वीवर परत आणण्यासाठी फायदेशीर ठरणार आहे. 'चांद्रयान -३' मिशनचे प्रोपल्शन मॉड्यूल १७ ऑगस्ट २०२३ ला विक्रम लँडरपासून वेगळा झाला होता आणि चंद्राच्या भोवती फिरत होता.

logo
marathi.freepressjournal.in