PM Modi : "चित्रपटांवर अनावश्यक..." पंतप्रधान मोदींनी भाजप नेत्यांना दिला 'हा' सल्ला

सध्या सुरु असलेल्या काही चित्रपटांवरील आक्षेपावर भाजप नेत्यांनी आक्रमक भूमिका घेतल्या होत्या, त्यावर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींनी (PM Modi) मत मांडले
PM Modi : "चित्रपटांवर अनावश्यक..." पंतप्रधान मोदींनी भाजप नेत्यांना दिला 'हा' सल्ला

गेल्या काही दिवसांपासून अभिनेता शाहरुख खान आणि दीपिका पदुकोण यांच्या 'पठाण' (Pathan) या चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी भाजपच्या (BJP) काही नेत्यांकडून केली गेली होती. चित्रपटातील 'बेशरम रंग' गाण्यामध्ये दीपिकाने घातलेल्या भगव्या रंगाच्या बिकनीवरून हा वाद निर्माण झाला होता. यावरून काही भाजप नेत्यांनी या गाण्यावर आक्षेप घेतला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी भाजप राष्ट्रीय कार्यकारणीच्या बैठकीमध्ये भाजप नेत्यांना चित्रपटांवरून महत्त्वाचा सल्ला दिला आहे. यावेळी ते म्हणाले की, भाजप कार्यकर्ते आणि नेत्यांनी चित्रपटांबद्दल अनावश्यक टिप्पणी टाळा, असा सल्ला दिला आहे.

भाजप कार्यकर्ते आणि नेत्यांना संधीत करत पंतप्रधान मोदी म्हणाले की, "आपण रात्रंदिवस काम करत असतो. काहीजण चित्रपटांबद्दल काही वक्तव्ये करतात आणि त्याची दिवसभर माध्यमांमध्ये चर्चा होते. त्यामुळे नेत्यांनी चित्रपटांबद्दल अनावश्यक वक्तव्ये करण्यापासून दूर र्हायले पाहिजे." यावेळी पंतप्रधान मोदींनी कोणत्याही चित्रपटाच्या नावाचा उल्लेख केला नाही. दरम्यान, भाजपचे आमदार राम कदम यांनी ‘पठाण’मधील ‘बेशरम रंग’ गाण्यावर आक्षेप घेतला होता. यावेळी त्यांनी 'हा चित्रपट हिंदुत्वाचा अपमान करणारा आहे.' असा आरोप केला होता. तर, दुसरीकडे भाजपचे नेते आणि मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरेत्तम मिश्रा यांनीही मध्य प्रदेशात चित्रपट प्रदर्शित होऊ न देण्याचा इशारा दिला होता.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in