पूर्व भारतात विरोधकांमुळे लोकसंख्येचे संकट; पंतप्रधान मोदी यांचा आरोप

पूर्व भारतातील बिहार, आसाम आणि पश्चिम बंगालसारख्या राज्यांमध्ये परकीय घुसखोरांमुळे ‘लोकसंख्येचे संकट’ निर्माण झाल्याचा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. विरोधी पक्ष या घुसखोरांना पाठिशी घालत असल्याचा आरोप त्यांनी केला.
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र
Published on

पूर्णिया (बिहार) : पूर्व भारतातील बिहार, आसाम आणि पश्चिम बंगालसारख्या राज्यांमध्ये परकीय घुसखोरांमुळे ‘लोकसंख्येचे संकट’ निर्माण झाल्याचा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. विरोधी पक्ष या घुसखोरांना पाठिशी घालत असल्याचा आरोप त्यांनी केला.

पूर्णियातील सभेत बोलताना मोदींनी काँग्रेसवरही टीका केली. काँग्रेसने बिहारच्या जनतेची तुलना 'बिडी' सोबत केली. हा ‘बिहारींचा अपमान’ असल्याचे त्यांनी म्हटले. काँग्रेस आणि राजदसारख्या पक्षांनी बिहारच्याच नव्हे तर संपूर्ण देशाच्या "सुरक्षेला आणि साधनसंपत्तीला" धोका निर्माण केल्याचा आरोप त्यांनी केला.

मोदी म्हणाले की, "स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात मी लोकसंख्या गणना मोहीम जाहीर केली होती. पण काँग्रेस, राजद आणि त्यांचा संपूर्ण गट परकीय घुसखोरांचे रक्षण करण्यात व्यस्त आहे. हेच त्यांचे मतदारसंघीय राजकारण आहे. हे विरोधी पक्ष इतके बेशरम झाले आहेत की, घुसखोरांच्या समर्थनार्थ घोषणा देत आहेत, यात्रा काढत आहेत," असा टोला मोदींनी मारला.

मोदी म्हणाले, "राजद, काँग्रेस आणि त्यांचे सहकारी लक्षात ठेवा, रालोआ ठाम आहे. प्रत्येक घुसखोराला देशाबाहेर हाकलले जाईल. त्यांना जितके प्रयत्न करायचे आहेत तेवढे करू देत, आम्ही घुसखोरांना बाहेर काढणारच. ज्यांना बेकायदेशीर घुसखोरांना पाठिशी घालायचे आहे त्यांनी लक्षात ठेवावे की, भारतात कायदा चालतो, घुसखोरांची मनमानी नाही. घुसखोरीवर कारवाई होईल, ही मोदींची हमी आहे," असेही ते म्हणाले.

राज्याच्या मतदार याद्यांवर विशेष पुनरावलोकन मोहिमेबाबत विरोधकांच्या आरोपांना उत्तर देताना मोदी म्हणाले की, ‘घुसखोरांना वाचवण्याच्या नावाखाली काँग्रेस-राजद लोकांना भ्रमात टाकत आहेत. बिहार आणि देश याचे योग्य उत्तर त्यांना देईल.’

काँग्रेसच्या केरळ युनिटने केलेल्या ट्विटचा (जे नंतर हटवण्यात आले) उल्लेख करत मोदी म्हणाले, "काँग्रेस नेत्यांनी म्हटले की बिडी आणि बिहार दोन्ही 'बी' अक्षराने सुरू होतात. हा बिहार आणि बिहारींचा अपमान आहे. लोक त्यांना लवकरच योग्य उत्तर देतील."

एनडीए सरकार गरीबांच्या हितासाठी कार्यरत असल्याचा दावा करताना मोदींनी विरोधकांवर आरोप केला की काँग्रेस-राजद सत्तेत असताना फक्त आपली तिजोरी भरत होते. या पक्षांना गरीबांसाठी मोफत धान्याची कल्पनाच नव्हती. पण आम्ही कोविडपासून गरीबांना मोफत धान्य पुरवले. तसेच आयुष्मान भारत योजनेतून मोफत आरोग्यसेवा दिली," असे मोदी म्हणाले.

logo
marathi.freepressjournal.in