निवडणूक आयोगाकडून मोदींच्या वादग्रस्त भाषणाची चौकशी सुरू

विरोधकांच्या वाढत्या दबावाच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजस्थानमध्ये केलेल्या वादग्रस्त भाषणासंदर्भात चौकशी सुरू...
निवडणूक आयोगाकडून मोदींच्या वादग्रस्त भाषणाची चौकशी सुरू

नवी दिल्ली : विरोधकांच्या वाढत्या दबावाच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजस्थानमध्ये केलेल्या वादग्रस्त भाषणासंदर्भात चौकशी सुरू केल्याचे सूत्रांनी सांगितले.

देशात जर काँग्रेस सत्तेवर आली तर ती लोकांच्या संपत्तीचे मुस्लिमांमध्ये पुनर्वितरण करेल, असे मोदी यांनी आपल्या भाषणात म्हटले होते. याबाबत कॉंग्रेसने आक्षेप घेत निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे.मोदींनी राजस्थानच्या बांसवाडा येथे रविवारी केलेल्या भाषणात म्हटले होते की, जर काँग्रेस सत्तेवर आली तर ती लोकांच्या संपत्तीचे मुस्लिमांमध्ये पुनर्वितरण करेल. देशाच्या संसाधनांवर अल्पसंख्याक समुदायाचा पहिला दावा आहे, असे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी वक्तव्य केल्याचे मोदींनी यावेळी सांगितले.

रविवारी मोदींच्या या भाषणाविरोधात काँग्रेस आणि सीपीआय-एमने स्वतंत्रपणे निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती. त्यांनी याप्रकरणी एफआयआर दाखल करण्याची मागणीही केली. पंतप्रधानांनी केलेल्या या वादग्रस्त भाषणाची निवडणूक आयोगाने आता चौकशी सुरू केल्याचे सूत्रांनी सांगितले.

logo
marathi.freepressjournal.in