पंतप्रधानांच्या रोड शोच्या सुरक्षेत झाली मोठी चूक; नेमकं काय घडलं?

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कर्नाटकच्या हुबळी येथे रोड शो करत अभिवादन करत असताना घडला प्रकार
पंतप्रधानांच्या रोड शोच्या सुरक्षेत झाली मोठी चूक; नेमकं काय घडलं?
Published on

आज पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कर्नाटकच्या हुबळी येथे रोड शो करत होते. ते युवक महोत्सवाच्या उदघाटनासाठी आले होते. यावेळी रोड शो चालू असताना एका तरुणाने सुरक्षा भेदत त्यांच्या गाडीकडे धाव घेतली. या प्रकारामुळे एकच गोंधळ उडाला. तात्काळ सुरक्षा रक्षांनी त्या तरुणाला गाडीपासून दूर तर केले. पण यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सुरक्षेवर मुद्दा उपस्थित करण्यात आला. या घटनेचा व्हिडीओदेखील व्हायरल झाला. यानंतर पोलिसांनी आपली बाजू स्पष्ट केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी कार्यक्रम स्थळी जात असताना एक रोड शो केला. यादरम्यान, एक तरुण पंतप्रधानांची सुरक्षा भेदत त्यांच्या गाडीजवळ आला. त्याच्या हातामध्ये हार होता. तो हार पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या गळ्यामध्ये घालण्याचा प्रयत्न त्याने केला. तात्काळ सुरक्षा रक्षकांनी त्या तरुणाला बाजूला केले. मात्र, या सर्व प्रकारामुळे एकच गोंधळ उडाला. या प्रकरणी पोलिस आयुक्तांनीही आपली बाजू स्पष्ट केली. त्यांनी पंतप्रधान मोदींच्या सुरक्षेत कोणत्याही प्रकारची चूक झाली नसल्याचा दावा केला. पण व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये तो तरुण हार घेऊन पंतप्रधानांच्या गाडीजवळ पोहोचल्याचे स्पष्टपणे दिसून येते.

logo
marathi.freepressjournal.in