"आपण खऱ्या अर्थाने आत्मनिर्भर", पंतप्रधान मोदींनी शेअर केला तेजस फायटर प्लेन चालवल्यानंतरचा अनुभव

तेजस हे भारतीय बनावटीचं एक लाईट-कॉम्बॅट एअरक्राफ्ट आहे.
"आपण खऱ्या अर्थाने आत्मनिर्भर", पंतप्रधान मोदींनी शेअर केला तेजस फायटर प्लेन चालवल्यानंतरचा अनुभव

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज तेजस फायटर प्लेन चावलण्याचा अनुभव घेतला. त्यांनी आपल्या एक्स हँडलवर फोटो शेअर करत आपला अनुभव सांगितला आहे. हा अनुभव घेतल्यानंतर त्यांनी आपल्या देशाच्या क्षमतेवरील विश्वास वाढला असल्याचं म्हटलं आहे. आपण खऱ्या अर्थाने आत्मनिर्भर आहोत, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज बंगळुरुमधील हिंदुस्तान एअरोनॉटिक्स लिमिटेडच्या फॅसलिटीला भेट दिली. यावेळी त्यांनी तेजस जेट विमानाच्या निर्मिती कारखान्याची पाहणी केली. सोबतच त्यांनी तेजस विमानामध्ये भरारी घेतली.

तेजस हे भारतीय बनावटीचं एक लाईट-कॉम्बॅट एअरक्राफ्ट आहे. तेजस रे कोणत्याही हवामानात उड्डाण करु शकतं. याला LiHT म्हणजे लीड-इन फायटर ट्रेनर असं देखील म्हटलं जातं. भारतीय हवाई दलाने HAL ला १२३ तेजल विमानांची ऑर्डर दिली आहे. यातील २६ तेजस मार्क-१ आतापर्यंत डिलिव्हर करण्यात आले आहेत. HALआता याचं अपग्रेडेड व्हर्जन देखील बनवत आहेत.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in