काँग्रेसने मागितला पंतप्रधानांचा राजीनामा, नितीश कुमारांना Dy PM ची ऑफर? मोदींची हॅटट्रीक N फॅक्टरवर निर्भर!

लोकसभेच्या ५४३ पैकी ५४२ जागांवर मतमोजणी सुरू असून निकाल यायला सुरूवात झाली आहे. संध्याकाळी साडेसहा वाजेपर्यंत भाजपच्या नेतृत्त्वाखालील एनडीएला २९१ जागांवर आघाडी मिळाली असली तरी...
काँग्रेसने मागितला पंतप्रधानांचा राजीनामा, नितीश कुमारांना Dy PM ची ऑफर? मोदींची हॅटट्रीक N फॅक्टरवर निर्भर!

लोकसभेच्या ५४३ पैकी ५४२ जागांवर मतमोजणी सुरू असून निकाल यायला सुरूवात झाली आहे. संध्याकाळी साडेसहा वाजेपर्यंत भाजपच्या नेतृत्त्वाखालील एनडीएला २९१ जागांवर आघाडी मिळाली असली तरी २०१४ आणि २०१९ च्या निवडणूक निकालांउलट, यावेळी एकटा भाजप बहुमतासाठी आवश्यक असलेल्या जादूई (२७२) आकड्यापासून दूर राहताना दिसत आहे. त्यामुळे सत्तास्थापनेसाठी भाजपला घटक पक्षांची गरज भासेल असे दिसते. दुसरीकडे इंडिया आघाडीला २३६ जागा मिळताना दिसत आहेत.

एनडीएला काठावरचं बहुमत मिळाल्यामुळे इंडिया आघाडीच्याही सत्ता स्थापनेच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. भाजप बहुमताच्या आकड्यापासून दूर राहणार असल्याचे दिसायला लागताच काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी पंतप्रधान मोदींनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा देण्याची मागणी केली आहे. "ते स्वतःला असाधारण असल्याचे भासवायचे. पण ते आता माजी पंतप्रधान बनणार हे सिद्ध झालं आहे. नैतिक जबाबदारी स्वीकारा आणि राजीनामा द्या. हाच या निवडणुकीचा संदेश आहे.", असे रमेश म्हणाले.

'एन' फॅक्टरचे महत्त्व

टीव्ही माध्यमांच्या वृत्तानुसार, सत्ता स्थापनेच्या आशा पल्लवीत होताच इंडिया आघाडीच्यावतीने नितीश कुमार यांच्याशी संपर्क साधण्यात आला असून त्यांना उपपंतप्रधान पदाची ऑफर देण्यात आल्याचे समजते. मात्र, याबाबत अद्याप अधिकृत माहिती मिळालेली नाही. बिहारमध्ये नितीश कुमार यांच्या जेडीयूला १४ आणि आंध्र प्रदेशमध्ये चंद्राबाबूंच्या टीडीपीला १६ जागा मिळताना दिसत आहेत. तर, भाजपला देशात २३९ जागा मिळतील अशी शक्यता आहे. त्यामुळे सत्तेच्या चाव्या नितीश आणि नायडूंच्या हाती असतील. तसे झाल्यास पंतप्रधान पदाची हॅटट्रीक करण्यासाठी नरेंद्र मोदींसाठी नितीश आणि नायडू हा 'एन' फॅक्टर महत्त्वाचा ठरणार आहे.

उद्या महत्त्वाची बैठक - राहुल गांधी

दरम्यान, सत्ता स्थापनेची शक्यता आहे का असा प्रश्न काँग्रेस नेते राहुल गांधी यांना विचारला असता, आम्ही उद्या आमच्या सहकाऱ्यांसोबत बैठक घेणार आहोत. तिथे याबाबत निर्णय घेतला जाईल. आमच्या सहकाऱ्यांना विचारल्याशिवाय आम्ही कोणतेही विधान करणार नाही, असे त्यांनी सांगितले.

logo
marathi.freepressjournal.in