"गेल्या ६० वर्षात काँग्रेसने..." ; एकीकडे विरोधकांचा गोंधळ तर दुसरीकडे मोदींची काँग्रेसवर टीका

आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यसभेत भाषण केले आणि काँग्रेसवर टीकाही केली, काँग्रेसनेही संसदेत मोठा गदारोळ केला.
"गेल्या ६० वर्षात काँग्रेसने..." ; एकीकडे विरोधकांचा गोंधळ तर दुसरीकडे मोदींची काँग्रेसवर टीका

आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राज्यसभेत भाषण केले. यावेळी त्यांनी पुन्हा एकदा काँग्रेसवर तोफ डागली. ते म्हणाले, "काँग्रेसने गेल्या ६ दशकात भारताचे वाटोळे केले. देशातल्या प्रश्नांवर कायमस्वरूपी उत्तर शोधण्याचा त्यांनी कधीच प्रयत्न केला नाही." अशी टीका त्यांनी यावेळी केली.

यावेळी विरोधकांनी मात्र त्यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. तरीही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेसवर ताशेरे ओढणे चालूच ठेवले. यावेळी विरोधक खासदारांनी राज्यसभेत 'मोदी-अदानी भाई भाई' अशा घोषणा देत पंतप्रधान मोदींच्या भाषणामध्ये अडथळे आणण्याचा प्रयत्न केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, "गेल्या ९ वर्षांमध्ये आम्ही देशातील अडचणींवर कायमचा उपाय शिधान्याचा प्रयत्न केला आहे. आम्ही अडचणींपासून दूर पाळणारे नाही, तर त्यावर उपाय शोधणारे आहोत." असे म्हणत त्यांनी विरोधकांना टोला लगावला. ते पुढे म्हणाले की, "देशामध्ये कमळ फुलण्यामध्ये मोठे योगदान हे विरोधकांचेच आहे. कारण, जेवढा चिखल तुम्ही आमच्यावर फेकाल, तेवढेच कमळ चांगले फुलेल." अशी टीका त्यांनी यावेळी केली.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in