बॅलेट पेपरवरून पंतप्रधान मोदींचा काँग्रेसला टोला

चार राज्यांतील विधान परिषद निवडणुकांमधील खराब कामगिरीवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस पक्षावर जोरदार निशाणा साधला आहे.
बॅलेट पेपरवरून पंतप्रधान मोदींचा काँग्रेसला टोला
बॅलेट पेपरवरून पंतप्रधान मोदींचा काँग्रेसला टोला(संग्रहित छायाचित्र)
Published on: 

नवी दिल्ली : चार राज्यांतील विधान परिषद निवडणुकांमधील खराब कामगिरीवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस पक्षावर जोरदार निशाणा साधला आहे. विरोधकांकडून ईव्हीएमचा विरोध करताना सातत्याने बॅलेट पेपरवर (मतपत्रिका) निवडणुका घेण्याची मागणी केली जाते, या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांनी हा टोला लगावला आहे.

बुधवारी उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, बिहार आणि कर्नाटक या चार राज्यांमधील २८ विधान परिषद जागांच्या द्विवार्षिक निवडणुकीचे निकाल समोर आले. यामध्ये उत्तर प्रदेशात भाजपने पाच तर समाजवादी पक्षाने तीन जागांवर विजय मिळवला, तर कर्नाटक विधान परिषदेत काँग्रेस पक्षाला एकाही जागेवर विजय मिळवता आला नाही आणि त्यांना भोपळाही फोडता आला नाही.

मोदींनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स'वर पोस्ट करत म्हटले, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, बिहार आणि कर्नाटक या चार मोठ्या राज्यांतील २८ जागांवर एमएलसी निवडणुका पार पडल्या. या निवडणुका बॅलेट पेपरद्वारे (मतपत्रिकेद्वारे) घेण्यात आल्या. यात काँग्रेसने किती जागा जिंकल्या. या निवडणुकांसाठी २३ ऑक्टोबर रोजी उत्तर प्रदेश, बिहार, कर्नाटक आणि महाराष्ट्रातील शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघांत मतदान झाले होते.

(संबधित इंग्रजी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in