वादग्रस्त विधाने टाळा; पंतप्रधानांचे नेत्यांना आदेश

भाजपच्या नेत्यांनी वादग्रस्त विधाने टाळावीत. सार्वजनिक जीवनात बोलण्यावर मर्यादा राखणे गरजेचे आहे. प्रत्येक मुद्द्यावर नेत्यांनी बोलले पाहिजे असे नाही, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पक्षाच्या नेत्यांना आदेश दिला. पंतप्रधान मोदी यांनी रविवारी रालोआच्या मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांची बैठक घेतली.
वादग्रस्त विधाने टाळा; पंतप्रधानांचे नेत्यांना आदेश
Published on

भाजपच्या नेत्यांनी वादग्रस्त विधाने टाळावीत. सार्वजनिक जीवनात बोलण्यावर मर्यादा राखणे गरजेचे आहे. प्रत्येक मुद्द्यावर नेत्यांनी बोलले पाहिजे असे नाही, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पक्षाच्या नेत्यांना आदेश दिला. पंतप्रधान मोदी यांनी रविवारी रालोआच्या मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांची बैठक घेतली. या बैठकीला केंद्रीय मंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह उपस्थित होते. तसेच १९ मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री उपस्थित होते. सूत्रांनी सांगितले की, पक्षाच्या काही नेत्यांच्या वक्तव्यामुळे पंतप्रधान नाराज आहेत.

वादग्रस्त बोलण्यामुळे पक्षाच्या प्रतिमेला धक्का बसत आहे. विजय शाह, जगदीश देवडा, रामचंद्र जांगड़ा आदी पहलगाम हत्याकांड व ऑपरेशन सिंदूरबाबत वादग्रस्त विधाने केली. त्यामुळे काँग्रेससहित विरोधी पक्षांनी पंतप्रधानांवर टीका केली. जात गणना ही मागास राहिलेल्या समाजाला मुख्य धारेत आणण्याचे काम करणार आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’ यशस्वी झाल्याने देशाची संरक्षण क्षेत्रात स्वावलंबनाकडे वाटचाल सुरू आहे. स्वदेशी संरक्षण तंत्रज्ञान हे मारा करण्यासाठी अचूक आहे, असे सूत्र म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत रालोआच्या मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी ऑपरेशन सिंदूरमध्ये सैन्य दलाचे शौर्य व पंतप्रधान मोदींच्या साहसी नेतृत्वाचे कौतूक करणारा प्रस्ताव मंजूर केला.

भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा म्हणाले की, रालोआ जातीच्या राजकारणावर विश्वास ठेवत नाही. पण, जातगणनेमुळे मागास वर्गीयांना मदत मिळेल.

हा प्रस्ताव राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनी मांडला तर शिवसेना नेते व महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्याचे समर्थन केले. ‘ऑपरेशन सिंदूर’मुळे भारतीयांचा आत्मविश्वास वाढला आहे, असे या प्रस्तावात नमूद केले.

logo
marathi.freepressjournal.in